Ajit Pawar Plane Crash Pudhari
पुणे

Ajit Pawar Plane Crash: रनवे 11 वर कसोटीचा क्षण: बारामतीच्या टेबल-टॉप धावपट्टीवर नेमकं काय घडलं?

दृश्यमानता, गो-अराउंड आणि लँडिंग परवानगीनंतर काही सेकंदांतच आगीचे लोळ

पुढारी वृत्तसेवा

बारामतीच्या ज्या टेबल टॉप धावपट्टीवर (रनवे 11) अजित पवारांचे विमान उतरण्यापूर्वीच कोसळले त्या प्रकारच्या धावपट्टीवर वैमानिकाचा कस लागतो. बुधवारी सकाळी आधी धावपट्टी दिसत नव्हती. ती दिसली, मग लँडिंगची परवानगी दिल्यानंतर उलट निरोप नाही, थेट आगीचे लोळ दिसले. केेंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाच्या निवेदनात दिलेला हा घटनाक्रम-

8.18 : व्हीआय-एसएसके विमान बारामतीच्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या प्रथम संपर्कात आले. बारामतीपासून 30 नॉटिकल माइल्सवर असताना विमानाचा नियंत्रण कक्षाला पुन्हा फोन आला. दृश्यमानता पाहून विमान उतरवण्याचा निर्णय वैमानिकाने घ्यावा असा सल्ला देण्यात आला.

विमान कर्मचाऱ्यांनी हवेचा वेग आणि दृश्यमानता किती याची चौकशी केली. वारा वाहत नव्हता आणि दृश्यमानता 3000 मीटरची होती.

धावपट्टी 11 च्या दिशेने निघाल्याचे वैमानिकाने कळवले. मात्र, धावपट्टी दृष्टीपथात नव्हती. त्यामुळे हवेतच एक चक्कर मारायची असे त्यांनी ठरवले.

एक फेरी मारल्यानंतर विमानाला ठावठिकाणा विचारला गेला. आता रनवे 11 च्या दिशेने निघाल्याचे वैमानिकाने सांगितले.

धावपट्टी दिसतेय का? या नियंत्रण कक्षाच्या प्रश्नावर विमान कर्मचाऱ्यांनी सांगितले की, धावपट्टी अद्याप दिसत नाही. ती दिसू लागताच पुन्हा फोन करू.

काही सेकंद गेले, धावपट्टी दिसत असल्याचे विमानाने कळवले.

8.43 वाजता रनवे 11 वर उतरण्याची परवानगी विमानाला देण्यात आली. मात्र, हा निरोप वाचल्याचा निरोप परत द्यायचा असतो तो विमानातून दिला गेला नाही.

8.44 : दुसऱ्याच क्षणी रनवे 11 म्हणजे धावपट्टी जवळच आगीचा लोळ उठल्याचे हवाई नियंत्रण कक्षाला दिसले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT