Crime Against Women Pudhari
पुणे

Baramati POCSO Case: बारामतीतील पोक्सो प्रकरणात आरोपीला 5 वर्षे सश्रम कारावास

अल्पवयीन मुलीला धमकावून शेतात ओढण्याचा प्रयत्न; अतिरिक्त सत्र न्यायालयाचा कठोर निकाल

पुढारी वृत्तसेवा

बारामती: बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याद्वारे दाखल खटल्यात अमोल बाळासाहेब आखाडे (वय 24, रा. कासुर्डी, ता. दौंड) याला येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. ए. वाणी यांनी 5 वर्षे सश्रम कारावास व 25 हजार रुपये दंड तसेच धमकी दिल्याप्रकरणी 2 वर्षे सश्रम कारावास व 25 हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली.

ही घटना 25 फेबुवारी 2016 रोजी रात्री घडली. पीडित अल्पवयीन मुलीचे वडील दारू पिऊन नशेत असल्याने त्यांना आरोपी अमोल आखाडे व त्याचा एक मित्र दुचाकीवरून घरी सोडायला आले होते. वडिलांना घरात सोडल्यानंतर आरोपींनी पीडितेला आमच्याबरोबर चल, नाही तर तुला बघतोच, तुला मारेन, अशी धमकी देत तिला घरामागील शेतात ओढत नेले. पीडित मुलीने आरडाओरडा केल्याने तिची आई तेथे आली. तिने आरोपीला मारण्यासाठी काठी उगारली असता, ते दोघे तेथून पळून गेले.

याबाबत पीडितेने यवत पोलिस ठाण्यात दोघा आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली होती. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक पूनम पाटील यांनी गुन्ह्याचा तपास करीत आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटला सुरू होण्यापूर्वीच अमोल आखाडे याच्यासोबत असलेल्या त्याच्या मित्राचे निधन झाले. त्यामुळे आखाडे याच्याविरोधात हा खटला चालवला गेला.

खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील संदीप ओहोळ यांनी काम पाहिले. त्यांनी एकूण पाच साक्षीदार तपासले. पीडित मुलीची व तिच्या आईची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. न्यायालयाने ती ग््रााह्य धरत आखाडे याला शिक्षा सुनावली.

तसेच दंडाची रक्कम पीडितेला देण्याचा व जिल्हा विधी सेवा समितीने नियमानुसार नुकसानभरपाई रक्कम देण्याचा आदेश दिला. या खटल्यात सरकारपक्षाला पोलिस उपनिरीक्षक गोरख कसपटे, हवालदार वेनुनाद ढोपरे यांचे साहाय्य झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT