Pune Municipal Election Analysis: मुंढवा–कोरेगाव पार्क प्रभाग 14 मध्ये भाजपचे वर्चस्व; तीन जागांवर विजय

चारपैकी तीन नगरसेवक भाजपचे विजयी; राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान
Pune Municipal Election Analysis
Pune Municipal Election AnalysisPudhari
Published on
Updated on

नितीन वाबळे

मुंढवा: मनपा निवडणुकीमध्ये प्रभाग क्र. 14 (कोरेगाव पार्क- घोरपडी- मुंढवा) मध्ये मागील पंचवार्षिकमध्ये चारही नगरसेवक भाजपचे होते. कोणतीही जोखीम न पत्करता या चारही उमेदवारांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली. भाजपचे किशोर धायरकर, उमेश गायकवाड व हिमाली कांबळे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. राष्ट्रवादीचे बंडूतात्या गायकवाड व संदीप कोद्रे या दिग्गज उमेदवारांना येथे पराभव पत्कारावा लागला. मात्र, भाजपच्या मंगला मंत्री यांना राष्ट्रवादीच्या सुरेखा कवडे यांनी पराभूत केले. हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला.

Pune Municipal Election Analysis
Pune Illegal Bangladeshi Case: बेकायदा बांगलादेशी तरुणीला अभय; फरासखाना पोलिस ठाण्यातील महिला हवालदार निलंबित

भाजपच्या चारही माजी नगरसेवकांनी मागील पंचवार्षिकमध्ये केलेली कामे, प्रभागामध्ये कार्यकर्त्यांनी एकदिलाने केलेला प्रचार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) मिळालेली साथ व उमेदवारांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून निवडणुकीमध्ये विजय मिळविण्यासाठी लक्ष केंद्रित केल्यामुळे भाजपच्या तीनही उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली. महाविकास आघाडीमध्ये काँग््रेास, शिवसेना ठाकरे गट व मनसे आव्हान निर्माण करेल अशी चर्चा होती. तिन्ही पक्षांच्या उमेदवारांना उमेदवारीही मिळाली होती. मात्र, या प्रभागामध्ये भाजप व राष्ट्रवादी अशा समोरासमोर झालेल्या या लढतीमध्ये आघाडीचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

Pune Municipal Election Analysis
Maharashtra Sahitya Parishad Manifesto: परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा 16 कलमी जाहीरनामा जाहीर

भाजपच्या माजी नगरसेविका हिमाली कांबळे यांना उमेदवारी मिळणार ही खात्री होती. ‌‘अ‌’गटामध्ये एससी महिला आरक्षण झाल्याने त्यांची उमेदवारी निश्चित झाली. राष्ट्रवादीने हिमाली कांबळे यांच्या सख्ख्या आत्या माजी उपमहापौर कै. नवनाथ कांबळे यांच्या भगिनी सुमन गायकवाड यांना उमेदवारी दिली. महाविकास आघाडीच्या स्वाती भिसे यांना अर्जमाघारीच्या शेवटच्या दिवशी एबी फॉर्म मिळाला होता. राष्ट्रवादीच्या सुमन गायकवाड व आघाडीच्या स्वाती भिसे या दोन्ही नवख्या उमेदवारांपुढे हिमाली कांबळे सरस ठरल्या व प्रभागात सुरुवातीपासून प्रचारात आघाडी घेतल्याने त्यांचा विजय सुकर झाला.

Pune Municipal Election Analysis
Pune Municipal Corporation: शोककाळात सांस्कृतिक कार्यक्रमांवर टीका; पुणे महापालिकेचे सर्व कार्यक्रम रद्द

राष्ट्रवादीच्या माजी महापौर कै. चंचलाताई कोद्रे यांचे पती संदीप कोद्रे यांच्या विरोधात भाजपकडून किशोर धायरकर अशी ‌‘ब‌’ गटामध्ये लढत होती. कॅन्टोंन्मेंट बँकेचे अध्यक्ष कैलास मामा कोद्रे यांनी त्यांचे पुत्र संदीप कोद्रे यांच्या विजयासाठी पूर्ण ताकद लावली होती. मात्र, पहिल्यांदाच निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या किशोर धायरकर यांनी प्रभागामध्ये कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभी केली होती. त्यामुळे धायरकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. राष्ट्रवादीचे बंडूतात्या गायकवाड व कोद्रे परिवार यांचा मागील चार-पाच पंचवार्षिक निवडणुकांपासून मुंढवा बालेकिल्ला होता. मात्र, या बालेकिल्ल्याला भाजपने सुरुंग लावला आणि मनपा निवडणुकांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंढव्यावर भाजपचा झेंडा फडकविला.

राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका सुरेखा कवडे व भाजपच्या माजी नगरसेविका मंगला मंत्री यांची ‌‘क‌’ गटामध्ये आमने- सामने लढत झाली. मतमोजणीच्या सहा फेऱ्यांपैकी पहिल्या तीन- चार फेऱ्यांमध्ये मंगला मंत्री काहीशा आघाडीवर होत्या. मात्र, शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये घोरपडी परिसरात सुरेखा कवडेंनी आघाडी घेतली व विजय संपादन केला.

Pune Municipal Election Analysis
Rohit Pawar Statement: ‘आम्ही काय बोलायचं हे कोणी ठरवू नये’ – रोहित पवारांचा सुनील तटकरेंना फटकारा

नगरसेवकपद नसतानाही नागरिकांसाठी केलेली कामे व अडीअडचणीच्या वेळी त्यांना केलेले सहकार्य याच्या जोरावर मतदारांनी तीन भाजप व एक राष्ट्रवादी असे क्रॉस वोटिंग करून सुरेखा कवडे यांना विजयी केले.

माजी उपमहापौर राष्ट्रवादीचे बंडुतात्या गायकवाड यांच्या विरोधात भाजपकडून त्यांचे सख्खे पुतणे उमेश गायकवाड अशी ‌‘ड‌’ गटामध्ये लक्षवेधी लढत होती. चार पंचवार्षिकमध्ये निवडून आलेल्या बंडुतात्या गायकवाड यांचा अनुभव व लोकांचा संपर्क याच्या जोरावर ते पुतण्याला सहज चितपट करतील, अशी शक्यता नागरिक व्यक्त करत होते. मात्र, उमेश गायकवाड यांनी त्यांच्यापेक्षा जवळपास दुप्पट मते मिळवून विजय मिळवला. कोरेगाव पार्क हा मनसेचा बालेकिल्ला समजला जातो. येथे मनसेच्या बाबू वागसकर यांना मोठे मताधिक्य मिळेल आणि मुंढवा व घोरपडी येथे काका-पुतण्यामधील मतविभागणीचा फायदा मिळवून बाबू वागसकर विजयी होतील, असा लोकांचा तर्क होता. मात्र, या सर्व वल्गनाच ठरल्या आणि भाजपच्या तीनही उमेदवारांना या तीनही ठिकाणी मताधिक्य मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news