Yerwada Municipal School E-Learning: येरवडा–गांधीनगरमधील महापालिका शाळांमध्ये ई-लर्निंग; विशाल मलके यांचा विकासाचा संकल्प

झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना ‘हाय क्लास’ शिक्षण, कचरा-रस्ते-ड्रेनेज प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचा निर्धार
Yerwada Municipal School E-Learning
Yerwada Municipal School E-LearningPudhari
Published on
Updated on

पुणे/येरवडा: येरवडा-गांधीनगर भागातील झोपडपट्टीमधील विद्यार्थ्यांना आता खासगी शाळांच्या तोडीचे हाय क्लास शिक्षण मिळणार आहे. ई-लर्निंगच्या माध्यमातून प्रभागातील महापालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासोबतच कचरा, रस्ते आणि ड्रेनेजच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचा निर्धार नवनियुक्त काँग््रेास नगरसेवक विशाल हरी मलके यांनी व्यक्त केला आहे.

Yerwada Municipal School E-Learning
Pune Municipal Election Analysis: मुंढवा–कोरेगाव पार्क प्रभाग 14 मध्ये भाजपचे वर्चस्व; तीन जागांवर विजय

नुकतीच विशाल मलके यांनी दै. पुढारी कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी आपल्या राजकीय प्रवासासह प्रभागाच्या विकासाचा रोडमॅप मांडला. प्रभाग क्रमांक 6 (येरवडा-गांधीनगर) मधून मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले मलके म्हणाले की, प्रभागात महापालिकेच्या शाळांची संख्या मोठी आहे.

Yerwada Municipal School E-Learning
Pune Illegal Bangladeshi Case: बेकायदा बांगलादेशी तरुणीला अभय; फरासखाना पोलिस ठाण्यातील महिला हवालदार निलंबित

मात्र, पटसंख्या कमी होत आहे, ही चिंताजनक बाब असून, ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षणाचा दर्जा उंचावून ही पटसंख्या वाढविण्याचा माझा मानस आहे. तरुण पिढीला व्यसनाधीनता आणि गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी शिक्षणासोबतच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर आमचा भर असेल.

Yerwada Municipal School E-Learning
Maharashtra Sahitya Parishad Manifesto: परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा 16 कलमी जाहीरनामा जाहीर

असा आहे विशाल मलके यांचा प्रवास

वडिलांच्या निधनानंतर वयाच्या 18 व्या वर्षी घराची जबाबदारी खांद्यावर घेतली. शिक्षण 12 वीपर्यंत झाले असले तरी काकांच्या मार्गदर्शनात व्यवसायात आणि समाजकार्यात जम बसविला. 2010 पासून काँग््रेासमध्ये सक्रिय झाले. 2014 मध्ये वडगाव शेरी युवा काँग््रेास अध्यक्ष, तर 2018 मध्ये पुणे शहर युवा काँग््रेास अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. कोविड काळात काँग््रेास भवनच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना औषधे आणि अन्नधान्य किटचे वाटप करून जनसंपर्क वाढवला.

Yerwada Municipal School E-Learning
Pune Municipal Corporation: शोककाळात सांस्कृतिक कार्यक्रमांवर टीका; पुणे महापालिकेचे सर्व कार्यक्रम रद्द

प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी झटणार

18 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर येरवड्यात काँग््रेासला यश मिळाले. हे यश टिकविण्यासाठी अनेक कामांना प्राधान्य देण्याचे ठरविले. यात कचऱ्याची समस्या कायमची मिटवणार आहे. रस्ते आणि ड्रेनेजलाइनचे आधुनिकीकरण करणार आहे. यासोबतच महापालिका शाळांमध्ये आधुनिक ई-लर्निंग सुविधा पुरविणे. येरवड्यातील जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी कटिबद्ध आहे. प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी विकासकामांचा धडाका लवकरच सुरू होईल, असे मत नगरसेवक विशाल मलके यांनी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news