PM Narendra Modi file photo
पुणे

Baramati PM Modi Visit: बारामतीत २४ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींचा दौरा; AI संस्थेची पाहणी, प्रेरणास्थळाचे उद्घाटन

विद्या प्रतिष्ठानमध्ये तयारीला वेग; शरद पवारांनी घेतला आढावा, रोबोटने केले पवारांचे स्वागत

पुढारी वृत्तसेवा

बारामती: बारामतीत उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स संस्थेची पाहणी व प्रेरणास्थळाच्या उदघाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आता २४ आॅक्टोबरला बारामतीत येणार आहेत. यापूर्वी १६ आॅक्टोबरला ते येणार असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु नवरात्रामुळे त्यांचा दौरा पुढे ढकलला गेला आहे.

यासंबंधी बुधवारी (दि. २३) बारामतीत विद्या प्रतिष्ठानमध्ये ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी एका बैठकीत तयारीचा आढावा घेतला. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २४ आॅक्टोबरला येणार असल्याची माहिती दिली गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

पंतप्रधानांच्या बारामती दौऱ्यात ते आर्टीफिशिअल इंटेलिजन्स संस्थेची पाहणी करणार आहेत. संस्थेचे सविस्तर प्रेझेंटेशन त्यांना देण्यात येणार आहे. विद्या प्रतिष्ठान कॅम्पसमध्ये प्रेरणास्थळाची उभारणी करण्यात आली आहे, त्याचे उद्घाटन देखील यावेळी होणार आहे.

दरम्यान बुधवारी बैठकीसाठी विद्या प्रतिष्ठानमध्ये पोहोचलेल्या शरद पवार यांचे स्वागत तेथील रोबोटने केले. संस्थेच्या सेंट्ल बिल्डींगमध्ये पवार आले असताना रोबोटद्वारे त्यांचे स्वागत झाले. पवार यांनी चला म्हणताच रोबोट बाजूला झाला. गेल्या काही वर्षापासून ज्येष्ठ शरद पवार हे येथे आर्टिफिशल इंटेलिजन्स क्षेत्रामध्ये काम करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT