पुणे

Baramati : राष्ट्रवादी युवकच्या 11 शाखांचे उद्घाटन

Laxman Dhenge

बारामती : पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा गुरुवारी (दि. 1) बारामती शहरात मॅरेथॉन दौरा पार पडला. या वेळी त्यांनी शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या 11 शाखांचे उद्घाटन पार पडले. जळोची, तांदुळवाडी, रुई, खंडोबानगर, जामदार रोड, एकतानगर, वसंतनगर, जगताप मळा, सिध्देश्वर गल्ली आदी भागातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शाखांची उद्घाटने पवार यांच्या हस्ते झाली. या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष जय पाटील, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, युवक अध्यक्ष अविनाश बांदल आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका विकासाची आहे. त्याचसाठी त्यांनी निर्णायक भूमिका घेतली. बारामतीच्या परिपूर्ण विकासासाठी त्यांना पाठिंबा देण्याची गरज जय पवार यांनी व्यक्त केली. शहराध्यक्ष जय पाटील आणि शहर कार्यकर्ते यांचे संघटन कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. जय पाटील यांनी सांगितले की, जय पवार यांच्या दौर्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून ते यापुढे संघटना बांधणीला वेळ देणार आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT