Prostitution Racket  Pudhari
पुणे

Baramati Prostitution Racket: बारामतीत वेश्या व्यवसायाचा भांडाफोड! लॉजवर पोलिसांचा छापा

मध्यरात्री कारवाई; दोन आरोपी अटकेत, पाच महिलांची सुटका

पुढारी वृत्तसेवा

बारामती: बारामती-भिगवण रस्त्यावरील वंजारवाडीजवळील अमृता लॉज (सोमनाथ हॉटेल) येथे सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे. येथे बारामती तालुका पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला. या वेळी दोन आरोपींना अटक केली, तर पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे.

या प्रकरणात हॉटेलचालक अजित जयसीन शेट्टी (वय 38) व चाँद कलाम आलम (वय 20) यांना अटक केली आहे. लॉजवर पश्चिम बंगालमधील तीन, भिवंडी मुंबई येथील दोन अशा पाच महिला मिळून आल्या. त्यांची सुटका करत त्यांना सुधारगृहात ठेवण्यात आले. 14 एप्रिल रोजी पहाटे तीनच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली.

पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक रामहरी भोसले यांच्या पथकाने बोगस ग््रााहकाच्या मदतीने सापळा रचला. पंचांना सोबत घेऊन नियोजनपूर्वक अमृता लॉजवर धाड टाकली. लॉजमधील विविध खोल्यांची तपासणी केली असता महिला व ग््रााहक एकत्र आढळून आले. चौकशीत संबंधित आरोपी हे बाहेरून महिलांना आणून त्यांना ग््रााहकांना पुरवत असल्याचे उघड झाले. ग््रााहकांकडून पैशांची वसुली करून त्यातून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत असल्याचेही समोर आले.

दोघा आरोपींनी संगनमत करून महिलांना पैशांचे आमिष दाखवत देहव्यवसाय चालविल्याचे निष्पन्न झाले आहे. कारवाईत पोलिसांनी बोगस ग््रााहकाला दिलेल्या नोटांसह रोख रक्कम, मोबाईल फोन, निरोधची पाकिटे तसेच ग््रााहकांची नोंद असलेले रजिस्टर असा सुमारे 17 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस उपनिरीक्षक रामहरी भोसले, अंमलदार संतोष कांबळे, केदारनाथ बिडवे, नितीन ढवाण, राजू बन्ने, नीलेश वाकळे, विठ्ठल तरंगे, स्मिता गायकवाड यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT