Balasaheb Thackeray Exhibition Pudhari
पुणे

Pune Balasaheb Thackeray Exhibition: ‘आमचेही फटकारे’ प्रदर्शनातून बाळासाहेब ठाकरे यांचे व्यंगचित्रविश्व उलगडणार

पुण्यातील बालगंधर्व कलादालनात 120 चित्रकारांच्या 200 चित्रांसह बाळासाहेब ठाकरे यांचे जीवन व व्यंगचित्रकला सादर होणार आहे

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शिवसेनाप्रमुख आणि ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनातील विविध पैलू ‌‘आमचेही फटकारे‌’ या चित्र, अर्कचित्र आणि व्यंगचित्र प्रदर्शनातून उलगडणार आहेत. जागतिक व्यंग्यचित्रकार दिन हा 5 मे रोजी साजरा केला जाणार आहे.

यानिमित्ताने कार्टून्स कट्टा, महाराष्ट्र व्यंग्यचित्रकार ग््रुाप आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मंगळवारी (दि. 5) आणि बुधवारी (दि.6) आयोजित या प्रदर्शनातून ठाकरे यांच्यावरील चित्रे, अर्कचित्रे रसिकांना पाहायला मिळणार आहेत.

ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देशभरातील चित्रकार-व्यंगचित्रकारांनी आपापल्या चित्रशैलीतून ठाकरे यांच्यावरील चित्रे आणि अर्कचित्रे हे प्रदर्शनाचे वैशिष्ट्‌‍य आहे. सोबतच ठाकरे यांनी स्वत: रेखाटलेली काही निवडक व्यंगचित्रेही रसिकांना पाहायला मिळतील.

हे प्रदर्शन जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व कलादालनात सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळेत आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी (दि. 5) सकाळी अकरा वाजता ज्येष्ठ कवी, वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या हस्ते होणार आहे. प्रदर्शनात 120 चित्रकारांनी रेखाटलेली ठाकरे यांच्यावरील निवडक 200 चित्रे व अर्कचित्रे पाहायला मिळतील. यासोबतच दोन दिवस निमंत्रित चित्रकार आणि व्यंग्यचित्रकारांची चित्र प्रात्यक्षिके आणि चर्चासत्रांचे आयोजनही केले आहे.

प्रदर्शनाविषयी संयोजक आणि व्यंग्यचित्रकार घनश्याम देशमुख म्हणाले, बाळासाहेब ठाकरे हे स्वत: उत्कृष्ट व्यंगचित्रकार होते. त्यांच्या व्यंगचित्र संग््राहाचे नाव फटकारे असे आहे. हाच विषय घेऊन मी देशभरातील चित्रकार आणि व्यंगचित्रकारांना ठाकरे यांचे त्यांनी रेखाटलेले चित्र आणि अर्कचित्र पाठविण्याचे आवाहन केले होते. त्याला चित्रकार आणि व्यंग्यचित्रकारांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT