बारामती : ‘आविष्कार 2025’ आंतरमहाविद्यालयीन संशोधन स्पर्धेत ॲग््राीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या डॉ. शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या संलग्नतेने डॉ. शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालयात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचा समारोप ॲग््राीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त व कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एस. मगर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या स्पर्धेत 10 जिल्ह्यांतील 37 महाविद्यालयांमधील एकूण 227 संशोधक विद्यार्थ्यांनी (123 मुले व 104 मुली) उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील संशोधन प्रकल्प सादर केले.
डॉ. शरदचंद्र पवार कृषी, कृषी व्यवसाय व्यवस्थापन तसेच पदव्युत्तर (कृषी, उद्यानविद्या, एम.बी.ए.) महाविद्यालयातील एकूण 48 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. यामध्ये पदव्युत्तर स्तरावरील 11 विद्यार्थ्यांनी विविध विभागांत उल्लेखनीय यश मिळविले.
मानवता, भाषा व कला विभागात वैष्णवी सातपुते (प्रथम), हृषीकेश ठुबे (तृतीय); कॉमर्स, मॅनेजमेंट व लॉ विभागात तन्वी शिरसाट (प्रथम), श्रावणी शिंदे (तृतीय); कृषी व पशुपालन विभागात अनिकेत गिरासे (तृतीय); प्युअर सायन्सेस विभागात सौरभ बिनवडे (प्रथम), संग््रााम गुंड (द्वितीय); अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागात शंतनू सावंत (प्रथम); मेडिसीन ॲण्ड फार्मसी विभागात साक्षी जाधव (प्रथम), आरती शिंदे (द्वितीय), अथर्व कुलकर्णी (तृतीय) यांनी यश संपादन केले. तसेच इतर विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट संशोधन प्रकल्प सादर केले.
यशस्वी विद्यार्थ्यांची निवड परभणी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ‘आविष्कार 2025’ संशोधन स्पर्धेसाठी झाली आहे. ॲग््राीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण संशोधन करण्याचे आवाहन केले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेसाठी प्रमुख संघ व्यवस्थापक व मार्गदर्शक म्हणून उपप्राचार्य एस. पी. गायकवाड, आविष्कार समन्वयक प्रा. राहुल एम. बेलदार यांच्यासह डॉ. पी. ए. पाटील, प्रा. जी. एस. शिंदे, प्रा. बी. एन. तांबे, डॉ. एस. एस. शेजूळ पाटील, डॉ. ए. डी. गोंडे, प्रा. शरद दळवे, डॉ. आरती जांभळे, प्रा. दिपाली कोळसे, प्रा. ए. गाढवे, प्रा. आर. गायकवाड, प्रा. एस. शिंदे, प्रा. आगळे व डॉ. क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले.