Sufrron Flag Pudhari
पुणे

Ashtavinayak Temple Closure 2026: अष्टविनायकातील तीन मंदिरे महिनाभर भाविकांसाठी बंद

जतन आणि संवर्धनाच्या कामासाठी 10 मे ते 9 जूनदरम्यान दर्शन बंद; नित्य पूजाअर्चा मात्र सुरू राहणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: अष्टविनायक विकास आराखड्याअंतर्गत पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली अष्टविनायकातील श्री मयूरेश्वर मंदिर, श्री चिंतामणी मंदिर आणि श्री सिद्धिविनायक मंदिराच्या जतन, संवर्धन आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

त्या पार्श्वभूमीवर ही मंदिरे उद्या रविवार (दि. 10 मे) ते मंगळवार (दि. 9 जून) या कालावधीत भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती पुरातत्व विभागाकडून दिली आहे.

पुरातत्व विभागाच्या नियोजनानुसार मंदिरांचा मुख्य गाभारा आणि सभामंडप यांचे पौराणिक स्वरूप जपत सुबक दगडी बांधकामाद्वारे संवर्धन करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे.

या कामादरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती कामात अडथळा निर्माण करू शकते. तसेच, कामाचा कालावधी वाढण्याची शक्यता असल्याने मंदिरे तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात पुरातत्व विभागाच्या संचालकांनी सह धर्मादाय आयुक्तांकडे विनंती अर्ज केला होता. त्यानंतर पुरातत्व विभाग, मंदिर प्रशासन, पुजारी वर्ग आणि ग््राामस्थ यांचे म्हणणे ऐकून घेत सह धर्मादाय आयुक्तांनी गुरुवारी मंदिरे तात्पुरती बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या कालावधीत मंदिरांमध्ये नित्य पूजाअर्चा आणि धार्मिक विधी नियमितपणे सुरू राहतील. मात्र, भाविकांना प्रत्यक्ष दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही. मंदिरांचे पुजारी, बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी, कर्मचारी आणि विश्वस्त यांच्याशिवाय अन्य कोणालाही प्रवेश मिळणार नाही असे मंदिर प्रशासनाने कळवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT