Maharashtra Rain Alert : राज्यातील 14 जिल्ह्यांना शनिवारी-रविवारी पावसाचा इशारा

यवतमाळ, चंद्रपूरमध्ये ऑरेंज अलर्ट
Raigad Rain Alert
Raigad Rain Alert(Pudhari File Photo)
Published on
Updated on

पुणे : उत्तर भारतात चक्रवात सक्रिय झाल्यामुळे संपूर्ण राज्यातील 14 जिल्ह्यांना शनिवारी आणि रविवारी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर विदर्भात जास्त राहणार असून, यवतमाळ व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना शनिवारी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

उत्तर भारतात वाऱ्यांची चक्रीय स्थिती तयार झाल्यामुळे काश्मीर ते केरळपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात 14 जिल्ह्यांना मान्सूनपूर्व पावसाचा इशारा देण्यात आला आहे. प्रामुख्याने विदर्भात जोरदार वादळवारे अन्‌‍ गारपिटीचा अंदाज असून उर्वरित भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे. शनिवार आणि रविवारी राज्यातील 14 जिल्ह्यांना मध्यम पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर यवतमाळ आणि चंद्रपूर येथे 9 रोजी मुसळधारेसह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

असे आहेत अलर्ट (कंसात तारीख)

ऑरेंज अलर्ट : चंद्रपूर (9), यवतमाळ (9). यलो अलर्ट : कोल्हापूर (9), सांगली (9), सोलापूर (9), नांदेड, लातूर, धाराशिव (9,10), अकोला, अमरावती, भंडारा, (9, 10), चंद्रपूर (10), गोंदिया (10), नागपूर (9), वर्धा (9), वाशिम (9), यवतमाळ (10).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news