Pune Airport Summer Rush: उन्हाळी सुट्यांचा पुणे विमानतळावर परिणाम; प्रवाशांची संख्या 18 हजारांच्या पार

पर्यटन आणि गावाकडे जाणाऱ्यांची वाढती गर्दी; शनिवार-रविवारी विमानांचे बुकिंग फुल्ल
Plane
PlanePudhari
Published on
Updated on

पुणे: सध्या उन्हाळी सुट्यांचा हंगाम सुरू झाला असून, त्याचे थेट चित्र आता पुणे विमानतळावर पाहायला मिळत आहे. पर्यटनासाठी बाहेर पडणारे नागरिक आणि सुट्यांसाठी घरी परतणारे विद्यार्थी यांच्यामुळे विमानतळावर प्रवाशांची मोठी रेलचेल वाढली आहे. एरवी दैनंदिन 15 हजार असणारा प्रवाशांचा आकडा आता 18 हजारांच्या वर पोहोचला आहे.

Plane
Pune Amit Lunkad Land Dispute: वडगाव शेरीत प्लॉट ताबा प्रकरण; अमित लुंकडसह 40 जणांवर गुन्हा

उन्हाळी सुट्यांमुळे पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत सरासरी 3 हजार प्रवाशांची वाढ झाली आहे. विशेषतः शनिवार आणि रविवारी हा आकडा अधिक वाढत असून, प्रामुख्याने पर्यटन स्थळे असलेल्या शहरांसाठी विमानांचे बुकिंग फुल्ल असल्याचे दिसून येत आहे.

Plane
Pune SSC Result 2026: पुणे विभागात दहावीच्या निकालात मुलींची बाजी; पुणे जिल्हा ठरला अव्वल

वाढत्या गर्दीची प्रमुख कारणे

  • शाळा-महाविद्यालयांना उन्हाळी सुट्या असल्याने कौटुंबिक सहलींचे प्रमाण वाढले आहे.

  • गोवा, केरळ, हिमाचल प्रदेश आणि काश्मीर यांसारख्या थंड हवेच्या ठिकाणांकडे पुण्यातून जाणारा ओघ मोठा आहे.

  • सुट्यांच्या काळात आयटी प्रोफेशनल आपल्या मूळ गावी जाण्यासाठी विमान प्रवासाला पसंती देत आहेत.

पुणे विमानतळावर सध्या उन्हाळी सुट्यांमुळे प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. दररोज सरासरी 15 हजार प्रवासी विमानतळावरून जातात; मात्र, आता हा आकडा 18 हजारांच्या घरात गेला आहे. प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा विचार करता, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी विमानतळ प्रशासनाकडून सुरक्षा तपासणी आणि इतर सुविधांचे चोख नियोजन करण्यात आले आहे.

संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news