Pune Amit Lunkad Land Dispute: वडगाव शेरीत प्लॉट ताबा प्रकरण; अमित लुंकडसह 40 जणांवर गुन्हा

ट्रॅक्टर-डंपर घुसवून कम्पाऊंड तोडल्याचा आरोप; विमानतळ पोलिसांत गुन्हा दाखल
Land Scam
Land ScamPudhari
Published on
Updated on

पुणे: बांधकाम व्यावसायिक अमित लुंकडसह 30 ते 40 जणांच्या विरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वडगाव शेरी परिसरातील एका प्लॉटवर ट्रॅक्टर, डंपर आणि वॉटर टँकर घुसवून कम्पाऊंड गेट तोडत जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लुंकड आणि त्याच्या साथीदारांवर आहे. यावेळी आरोपींनी येथील सुरक्षारक्षकाला देखील मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Land Scam
Pune SSC Result 2026: पुणे विभागात दहावीच्या निकालात मुलींची बाजी; पुणे जिल्हा ठरला अव्वल

याबाबत बांधकाम व्यावसायिक रवींद्र हिरालाल दुगड (वय 58, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित लुंकड, राज ढाकलिया, रूपेश ढाकलिया, बिडकर, अमित लुंकड यांचा मॅनेजर आणि इतर 30 ते 40 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा प्रकार 7 मे रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास वडगाव शेरी येथील सर्व्हे नंबर 30 मधील प्लॉटवर घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दुगड हे दुगड ग््रुापच्या माध्यमातून बांधकाम व्यवसाय करतात. वडगाव शेरी येथील सर्व्हे नंबर 30 मधील दुगड यांच्या प्लॉटवर गेल्या काही महिन्यांपासून बांधकामाचे काम सुरू आहे.

Land Scam
Pune Accident | खेड शिवापूर टोल नाक्याजवळ टँकरच्या धडकेत दाम्पत्याचा जागीच मृत्यू; संतप्त नागरिकांकडून टँकरची तोडफोड

त्यासाठी साईटवर सुपरवायझर आणि सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. गुरुवारी (दि. 7) सायंकाळी अमित लुंकड, राज, रुपेश ढाकलिया व इतर ट्रॅक्टर, डंपर आणि वॉटर टँकर घेऊन प्लॉटवर आले. त्यांनी साईटच्या गेटची तोडफोड करून वाहने आत घुसवली, तसेच सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटनेची माहिती मिळताच फिर्यादी व त्यांचा मुलगा घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी आरोपींकडून ‌‘हा आमचा प्लॉट आहे, तुम्ही येथून निघून जा,‌’ अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. पोलिस घटनास्थळी आल्यानंतर आरोपी तेथून निघून गेले. दरम्यान, विमाननगर विभागाचे पोलीस निरीक्षक घटनास्थळी आल्यानंतर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. त्यावेळी फिर्यादींनी अमित लुंकड यांच्या वाहनात हत्यारे असल्याचा संशय व्यक्त केला. त्यानंतर लुंकड हे वाहनातून तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. जमिनीचा जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न, गेटची तोडफोड आणि धमकीप्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस उपनिरीक्षक नितीन राठोड पुढील तपास करत आहेत.

Land Scam
Pune Crime | नराधम बापास जन्मठेप! पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याला शिक्षा

काय आहे प्रकरण

मौजे वडगाव शेरी येथील सर्व्हे क्रमांक 30 मधील 40 गुंठे जागा गलांडे व इतर सात जणांनी तालेरा यांच्याकडून सामाईकपणे खरेदी केली. 1995 ते सन 2002 पर्यंत त्यापैकी सुमित राठोड यांनी 34.5 गुंठे जागा खरेदी केली. त्यातील उर्वरीत जागा ही लुंकड यांनी खरेदी केली. सन 2023 मध्ये सुमित राठोड यांच्याकडून 31 गुंठे जागा दुगड इन्फ्रास्ट्रक्चर एलएलपीच्या नावे व 3.5 गुंठे तेजस दुगड यांच्या नावे खरेदी केली. सातबारा उताऱ्यावर फिर्यादींची नावे लागलेली आहेत. तसेच जागा खरेदी करताना राठोड यांच्या प्लॉटचे प्रॉपर्टी टॅक्स फिर्यादी व त्यांच्या संबंधित कंपनीच्या नावावर लागले आहेत. लाईट व पाण्याचे मीटर देखील त्यांच्या नावावर आहे. त्या जागेवरील बांधकामासाठी संरक्षण मंत्रालयाची एनओसी, फायर प्रोव्हिजनल एनओसी घेतली आहे. महापालिकेकडून जागेवर प्लॅन मंजूर करून घेतला असून, त्यासाठी महापालिकेकडे पाच कोटी रुपये चलन भरले आहे. दोन महिन्यांपासून फिर्यादींनी या जागेवर बांधकाम सुरू केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Land Scam
Madanwadi lake water crisis: मदनवाडी तलावातील साठा खालावला; शेतकऱ्यांची चिंता वाढली

पोलिस आयुक्तांच्या नावे धमकावले?

फिर्यादी रवींद्र दुगड यांनी सांगितले, ‌‘प्लॉटवर आलेल्या अमित लुंकड याने आमच्या कर्मचाऱ्यांना, तसेच मला पोलिस आयुक्तांच्या नावाने धमकावले. तो पोलिस आयुक्तांच्या नावाचा वापर करत असून, त्यांना फोन लावल्यासारखे भासवत परिसरात दहशत निर्माण करत होता.

अमित लुंकड आणि त्याच्या साथीदारांनी वडगाव शेरी येथील एका जागेचा बेकायदा ताबा घेण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी त्याच्यासह इतर 30 ते 40 जणांच्या विरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमय मुंडे, पोलिस उपायुक्त परिमंडळ सात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news