Counseling Pudhari
पुणे

Amrut Manas Mitra Training: ‘अमृत मानस मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रम सुरू; मानसिक आरोग्य सेवेला नवा बळ

विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी महाराष्ट्र शासनाचा उपक्रम; १५ दिवसांचे ऑफलाइन प्रशिक्षण व फिल्ड प्लेसमेंटची संधी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्य शासनाच्या महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या स्वायत्त संस्थेतर्फे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, भावनिक सक्षमीकरण आणि समुपदेशन सेवा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने 'अमृत मानस मित्र' समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासनाची मानसिक आरोग्य क्षेत्रातील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था ही तांत्रिक व शैक्षणिक सहकार्य करणार आहे.

या प्रशिक्षणासाठी एम.ए./एम.एस्सी. मानसशास्त्र, एम.ए./एम.एस्सी. समुपदेशन मानसशास्त्र किंवा मास्टर ऑफ सोशल वर्क ही पदव्युत्तर पदवी असलेले पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. या क्षेत्रातील पूर्वानुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

पहिल्या बॅचसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २९ जून २०२६ आहे. मानसिक आरोग्य, विद्यार्थी समुपदेशन, भावनिक आधार, संवादकौशल्ये, सक्रिय ऐकणे, सहानुभूतीपूर्ण प्रतिसाद, संकट व्यवस्थापन, जीवनकौशल्ये आणि मानस सामाजिक साहाय्य यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर आधारित हा अभ्यासक्रम असून, सहभागी उमेदवारांना प्रत्यक्ष कार्यक्षम समुपदेशक म्हणून घडविण्यावर भर देण्यात आला आहे.

असा आहे प्रशिक्षण कार्यक्रम

  • 'अमृत मानस मित्र' प्रशिक्षण हे अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी पूर्णपणे मोफत असले तरी निवास, भोजन आणि राहण्याची व्यवस्था उमेदवारांनी स्वतःच्या खर्चाने करावयाची आहे.

  • या कार्यक्रमातून १५ दिवसांचे ऑफलाइन प्रशिक्षण, अधिकृत प्रमाणपत्र, फिल्ड प्लेसमेंट आणि रोजगारक्षम कौशल्यविकासाची संधी मिळणार आहे.

  • प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अमृत आणि महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचे संयुक्त अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

  • प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पुणे येथे १५ दिवसांचा ऑफलाइन असेल. यामध्ये इंटरॅक्टिव्ह सत्रे, केस स्टडीज, प्रात्यक्षिक उपक्रम आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाईल. त्यानंतर एका महिना फिल्डवर काम करावे लागणार आहे. ज्यामध्ये सहभागी उमेदवारांना जिल्हास्तरावरील शाळा किंवा महाविद्यालयांशी जोडले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT