Nasrapur Murder Case Verdict: नसरापूर बालिका अत्याचार-हत्या प्रकरणात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष; नसरापुरमध्ये पोलिस बंदोबस्तात वाढ

साडेतीन वर्षीय चिमुकलीच्या हत्या प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय; अंतिम शिक्षा २९ जूनला जाहीर होणार
Nasrapur Murder Case Police Security
Nasrapur Murder Case Police SecurityPudhari
Published on
Updated on

नसरापूर: महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर येथील साडेतीन वर्षीय चिमुकलीच्या लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणाचा निकाल आज लागला आणि आरोपीला दोषी ठरविण्यात आले. मात्र न्यायालयाने आरोपीला शिक्षा २९ जूनला होणार असल्याचे जाहीर केले.

Nasrapur Murder Case Police Security
PMC Rehabilitation Flats Survey: पुनर्वसन सदनिकांमध्ये पोटभाडेकरूंचा शिरकाव?; महापालिकेची तपासणी मोहीम सुरू

याबाबत नसरापूरकरांनी आम्हाला न्यायदेवतेवर विश्वास असल्याचे भावना व्यक्त करत शांतता ठेवली आहे. मात्र पुढील अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी घटनास्थळावर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

Nasrapur Murder Case Police Security
SRA Scam: गवळी माथा एसआरए प्रकल्पात अनियमिततेचा आरोप; १४ वर्षांचा रखडलेला प्रकल्प वर्षभरात मार्गी

आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय६५) या वृद्ध नराधमाने खाऊचे अमिष दाखवून नसरापूर ( ता. भोर) येथे एका साडेतीन वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला होता. ही घटना ( १ मे रोजी ) घडली होती. या गुन्ह्याच्या प्रकरणी केवळ नसरापूरच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष निकालाकडे पीडित कुटुंबासह संपूर्ण राज्याचे डोळे लागले होते.

Nasrapur Murder Case Police Security
Monsoon Delay Impact: मान्सूनच्या प्रतीक्षेत आंबेगाव; खत-बी-बियाण्यांच्या विक्रीला ब्रेक

आरोपीला फाशीची शिक्षा होणार असल्याचे आत्मविश्वास बाळगून सर्वांच्या नजरा टीव्ही माध्यमावर दिवसभर खिळले होते. मात्र याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला शिक्षा सोमवार २९ जूनला देणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतू आजच्या निकालात आरोपी भीमराव कांबळे हा दोषी आढळला आहे. यामुळे पुढील अंतिम निकालात आरोपीला फाशीची शिक्षा ( मृत्युदंड ) की जन्मठेप कारावास होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Nasrapur Murder Case Police Security
Kedgaon Illegal Sex Determination Abortion Racket: केडगाव गर्भलिंगनिदान प्रकरणात आणखी दोघे जेरबंद; रॅकेटचा तपास अधिक वेगात

मात्र नराधम आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. नसरापूरमध्ये शांतता आहे. मात्र परिसरात व घटनास्थळी राजगड पोलिसांनी बंदोबस्त कायम जैसे थे ठेवून पोलीस पथक वाढविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news