SPPU Ranking Drop: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची रँकिंग घसरली; विशेष अधिसभेची मागणी

QS आणि NIRF मानांकनात मोठी पीछेहाट; कुलगुरूंवर नाराजी व्यक्त करत अधिसभा सदस्य आक्रमक
SPPU
SPPUPudhari
Published on
Updated on

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एनआयआरएफ तसेच क्यूएस रँकिंगमध्ये दर्जा घसरला असून, विद्यापीठाची चांगलीच पीछेहाट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य आक्रमक झाले असून, घसरलेल्या रँकिंगबाबत चर्चा करण्यासाठी विशेष अधिसभा घेण्याची मागणी संबंधित अधिसभा सदस्यांनी केली आहे.

SPPU
Lawrence Bishnoi Gang Threat: पुण्यात बिष्णोई गँगची पुन्हा दहशत! वडकीतील व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी

नुकत्याच जाहीर झालेल्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग या जागतिक मानांकनामध्ये सावित्रीबाई फुले पुणे वि‌द्यापीठ ७९१-८०० या क्रमांकावर फेकले गेलेले आहे. सन २०२५ मध्ये या मानांकनामध्ये विद्यापीठ ५६६ व्या स्थानावर होते.

SPPU
Pune Registration Offices: महसुलात 10,851 कोटींची भर, तरी पुण्याच्या 21 दस्तनोंदणी कार्यालयांत अधिकारीच नाहीत!

त्याचप्रमाणे याआधी वि‌द्यापीठाचे स्थान एनआयआरएफ रँकिंगमध्येसुद्धा घसरले होते. याबाबत वि‌द्यापीठाचे अधिसभा सदस्य आक्रमक झालेले आहेत. विद्यमान कुलगुरू हे कोणतेही निर्णय वेळेत घेत नाहीत, कोणत्याच विषयांवर ठाम भूमिका घेत नाहीत, वि‌द्यापीठात संशोधनाला आवश्यक वातावरण निर्माण करण्यात कुलगुरू अयशस्वी झालेले आहेत असे अधिसभा सदस्यांचे मत आहे.

SPPU
Nasrapur Murder Case Verdict: नसरापूर बालिका अत्याचार-हत्या प्रकरणात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष; नसरापुरमध्ये पोलिस बंदोबस्तात वाढ

या सर्व कारणांनी विद्यापीठाचा दर्जा घसरत चालला आहे आणि याचा परिणाम विद्यापीठातील प्रवेशावरसुद्धा झालेला दिसून येत आहे, असे या सदस्यांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर अधिसभा सदस्य विनायक आंबेकर यांनी कुलगुरूंना पत्र पाठवून क्यूएस 'रँकिंगमधील सुधारणा' या विषयावर चर्चा करण्यासाठी अधिसभेची विशेष सभा घेण्याची मागणी केलेली आहे. अन्य अधिसभा सदस्यांनी देखील या मागणीला पाठिंबा दर्शवला असल्याचे आंबेकर यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news