पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी शहरात होत आहे. नाट्य संमेलनातील विविध कार्यक्रम व नाटके ज्या पाच नाट्यगृहात होणार आहेत, त्या नाट्यगृहांवर रोषणाई करण्यात आली आहे. या सजलेल्या नाट्यगृहांमुळे उद्योगनगरीत 100 व्या नाट्य संमेलनाचे पडघम वाजू लागले आहेत.
चिंचवडगाव येथील केशवनगरमधील मोरया गोसावी क्रीडांगण मुख्य सभा मंडपाशिवाय पिंपळे गुरव येथील निळू फुले नाट्यगृह, भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह, चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह तसेच निगडी येथील ग. दि. माडगूळकर सभागृह 1 व 2 या पाच ठिकाणी उदघाटन सोहळ्यादरम्यान तब्बल 64 वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम व नाटकांची मेजवानी रसिक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ही सर्व नाट्यगृहे आता विद्युत रोषणाईने सजली असून नाट्यगृहांचा परिसर व उद्योगनगरीतील सांस्कृतिक वातावरणात उत्साही झाले आहे.
हेही वाचा