Ajit Pawar Memorial Pudhari
पुणे

Ajit Pawar Memorial Baramati: अजित पवारांच्या अंत्यस्थळी शरद पवार यांची भावूक भेट

बारामतीत अजितदादांच्या भव्य स्मृतिस्थळाबाबत पवार दाम्पत्याची चर्चा

पुढारी वृत्तसेवा

बारामती: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर ज्याठिकाणी अंत्यसंस्कार झाले त्याठिकाणी रविवारी (दि. 1) ज्येष्ठ नेते खा. शरद पवार व प्रतिभा पवार यांनी मुंबईला जाण्याआधी भेट दिली. या वेळी त्यांनी अंत्यविधी झालेल्या स्थळाकडे नजर टाकली. दोघेही यावेळी भावूक झाले होते. याप्रसंगी त्यांनी विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांच्याशी अजित पवारांच्या स्मृतिस्थळासंदर्भात चर्चा केल्याचे गुजर यांनी सांगितले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने राज्यातील राजकीयदृष्ट्‌‍या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असुन, मागील चार दिवसात पवार कुटुंबियांवर राजकीय चर्चना उधाण आले असुन, त्यांच्या प्रत्येक घडामोडीवर देशाचे लक्ष लागले आहे.

त्यातच रविवारी सकाळी मुंबईला निघण्यापूर्वी शरद पवारांनी दिवंगत अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार झालेल्या मैदानावर पोहचत गाडीतून न उतरता त्यांनी अंत्यस्थळाकडे पाहिले. याप्रसंगी दोघेही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

यानंतर त्यांनी विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांच्याशी अजितदादांच्या स्मारकाविषयी चर्चा केली व ते मार्गस्थ झाले. यानंतर गुजर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, अजितदादांचे स्मारक भव्यदिव्य व्हावं, अशी पवार साहेबांची इच्छा असून, शहरात झालेली विकासकामे विविध संकल्पनेतून व विविध दृष्टिकोनातून झाल्या आहेत.

अजित पवारांचे नियोजित स्मृतिस्थळ देखील अत्यंत भव्यदिव्य व्हावे, अशा स्वरूपाने बारामतीसह राज्यभरातील विविध वास्तू विश्वस्तांकडे चर्चा करून व त्यांच्याकडून आलेख घेऊन अत्यंत चांगल्या प्रकारचे स्मृतिस्थळ करण्याची आमच्या सर्वांची इच्छा आहे. त्यानुसार हे काम होईल. त्याबाबत शरद पवार व प्रतिभा पवार यांनी चर्चा केली, असे गुजर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT