Ajit Pawar Plane Crash Analysis: अजित पवार यांचे आज (दि. २८ जानेवारी) विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. या निधनानंतर विमान अपघाताबाबत चर्चा सुरू झाली आहे. संबंधित तापस यंत्रणांनी आपलं तपासकार्य सुरू केलं असून याबाबत उलट सुलट थेअरी मांडल्या जात आहेत. मात्र आता देशाचे क्रेंद्रीय उड्डाण मंत्री रोम मोहन नायडू आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांच्या विमानाला अपघात कशामुळे झाला असावा याचा प्राथमिक अंदाज काय आहे याबाबत माहिती दिली.
केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी मृत्यूनंतर प्रतिक्रिया दिली. ही प्रतिक्रिया देताना त्यांचे डोळे पाणावले. मोहोळ म्हणाले, 'माझ्यासाठी हा अनपेक्षित धक्का आहे. अजूनही विश्वास बसत नाहीये. मी अनेक वर्षे त्यांच्यासोबत काम केलं आहे. त्यांची प्रशासनावर पकड होती. कोवीडमध्ये अडीच वर्षे काम केलं.दादा आपल्यात नाही याच दुःख होत आहे.'
मुरलीधर मोहोळ यांनी विमान अपघाताबाबत तपासाचा प्राथमिक अंदाज काय आहे याबाबत देखील माहिती दिली. ते म्हणाले, 'प्रथमदर्शनी जे जाणवतंय ते दृष्यमानतेचीच समस्या होती असं जाणवंतय. दृष्यमानतेच्या समस्येमुळे हा अपघात घडला असावा. सुरूवातीला तरी तसंच दिसतंय. याचे अंतिम निष्कर्ष येतील. सगळ्या संस्था निष्पक्षपणे काम करतील.' शेवटी मोहोळ यांनी दादांशिवाय मुंबई आणि पुण्याचे राजकारण अधुरं आहे अशी भावनिक प्रतिक्रिया देखील दिली.
केंद्रीय उड्डाणमंत्री राम मोहन नायडू यांनी देखील अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत माहिती दिली. त्यांनी माझे ह्रदय जड झाले आहे. ही गोष्ट न पचण्यासासारखी आहे. आमची अजित पवार यांच्यासोबत भेट व्हायती. तरूण मंत्री म्हणून ते मार्गदर्शन करायचे. त्यांचे काम आणि कामाची पद्धत चांगली होती.
नायडू यांनी देखील तपासाबाबत अजून तपास सुरू आहे. जेव्हा विमान उतरण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी काही तरी प्रॉब्लेम झाला असं सांगितलं. सध्याच्या घडीला तरी विमान अपघाताबाबत अत्यंत प्राथमिक स्वरूपाची माहिती मिळत आहे.
दरम्यान, पुढारीने Nag Aviation Expert विशाल बांगरे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी विमान कोणत्या कंपनीचं होतं. त्याची वैशिष्ट्ये काय होती याबाबत माहिती दिली.
विशाल बांगरे यांनी, हे विमान बंबार्डियरचं लियरजेट विमान होत. यापूर्वीही अनेकदा या विमानातून दादांनी प्रवास केला होता. हवामान विभागातून मिळालेल्या माहितीनुसार व्हिजिबिलिटी कमी असल्याचं सांगण्यात येत आहे. पायलटने देखील व्हीआयपी ऑन बोर्ड असताना एक सर्किट राऊंड घेण्याची दक्षता घेतली. त्यांनी लँडिंगचा प्रयत्न केला.
बांगरे पुढे म्हणाले की, पायलटने मे डे कॉल दिला आहे. ज्यावेळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते त्यावेळीच पायलट मे डे कॉल देतो. पायलटने त्यावेळी जी परिस्थिती असेल त्या प्रमाणे निर्णय घेतला.'
दरम्यान विशाल बांगरे यांनी, 'विमान उड्डाणापूर्वी प्रत्येक गोष्ट चेक केली जाते. पायलटला विमान चेक करून सगळे क्लिअरन्स मिळाल्याशिवाय विमान उडवता येत नाही. बम्बार्डियन कंपनी ही नामांकित कंपनी आहे. ही छोटी विमाने सहसा व्हीआयपींसाठीच वापरली जातात. जगभरात ही विमाने वापरली जातात.' अशी माहिती दिली.
ते पुढे म्हणाले की, 'सगळ्या विमानात डेटा आणि ब्लॅक बॉक्स सिस्टम असते. तपास पथकाद्वारे तो ब्लॅक बॉक्स आणि रेकॉर्डर तपासण्यात येईल.' बांगरे यांनी विमान उड्डाणाचे जितके अंतर असते आणि विमानाच्या प्रकारावरून त्यात इंधन भरलं जातं. या केसमध्ये इंधन टाकी खाली आदळल्यामुळं स्फोट झाल्याचं दिसून येत आहे.
तपासाबाबत बोलताना विशाल बांगरे म्हणाले, ९० दिवसांच्या आत प्राथमिक अहवाल द्यावा लागतो. त्यानंतर सखोल अहवाल सादर करावा लागेल. विमान कंपनी देखील स्वतः या अपघाताची चौकशी करते.