
बंधू–बहिणीचं अतूट नातं:
सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचं बंधू प्रेम केवळ कुटुंबापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरलेलं होतं.
एकत्र सुरू झालेला राजकीय प्रवास:
दोघांचाही राजकीय प्रवास थोड्याफार फरकाने एकाच काळात सुरू झाला. शरद पवार यांच्या छत्राखाली वाढलेली ही जोडी राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख बनली.
राजकीय भूमिका आणि निर्णयांमध्ये काही टप्प्यावर मतभेद निर्माण झाले, मात्र भावंडातील नातं कधीच तुटले नाही.
राजकीय भूकंपानंतर निर्माण झालेली दरी:
मागील काही वर्षांतील मोठ्या राजकीय घडामोडींमुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता, जो सर्वांनाच जाणवत होता.
टिकेला बहिणीचं सडेतोड उत्तर:
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेला सुप्रिया सुळे यांनी ठाम आणि सडेतोड उत्तर देत अजितदादांच्या पाठीशी उभं राहिलेलं आपण पाहिलं आहे.
राजकारणापेक्षा नात्याला प्राधान्य:
मतभेद असूनही, सार्वजनिक पातळीवर अजितदादांविषयी आदर आणि आपुलकी दाखवण्यात सुप्रिया सुळे कधीही मागे राहिल्या नाहीत.
व्हॉट्सॲप स्टेटसमधून व्यक्त झालं दुःख:
अजित पवार यांच्या निधनानंतर सुप्रिया सुळे यांनी ठेवलेला भावनिक करणारा व्हॉट्सॲप स्टेटस 'उध्वस्त' त्यांच्या अंतःकरणातील वेदना स्पष्टपणे सांगून गेला.
आज अचानक झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्याची बातमी संपूर्ण राज्यासह देशाला हादरवणारी ठरली.
कधीही न भरून न निघणारी पोकळी:
या अपघाती निधनामुळे सुप्रिया सुळे यांच्या आयुष्यात भावनिकदृष्ट्या कधीही न भरून न निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
राजकारणापलीकडचं नातं कायम:
सत्ता, आणि भूमिका बदलल्या, पण सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचं बंधू–बहिणीचं नातं अखेरपर्यंत राजकारणाच्या पलीकडे जाऊन टिकून राहिलं आणि तेच या नात्याचं खरं सामर्थ्य ठरलं.