वाघोली/वडगावशेरी: “राष्ट्रवादी काँग््रेास हा पुण्यातल्या मातीचा पक्ष असून पुणेकरांनी आम्हाला नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे आमचे पुण्यावर विशेष प्रेम आहे,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. चंदननगर भाजी मंडई येथे प्रभाग क्रमांक 3, 4 व 5 मधील राष्ट्रवादी काँग््रेासच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
पवार म्हणाले, “वडगाव शेरी मतदारसंघात काढलेल्या रोड शोला नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. नदीसुधार योजनेपेक्षा प्रथम शहर स्वच्छ करणे आवश्यक होते. कोयता गँगवर कठोर कारवाई केली जाईल.
रहिवासी भागातील पब बंद करू. अवैध धंदे चालू असलेल्या ठिकाणी संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई केली जाईल. टँकरमाफियांचे कंबरडे मोडले जाईल. माझ्या उमेदवारांच्या वाकड्यात कोणी गेला तर मी सोडणार नाही; मीही मोठ्या काकाचा पुतण्या आहे,” असे त्यांनी ठाम शब्दांत सांगितले.
वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मेट्रो आणि पीएमपीएल सेवा मोफत देण्याची घोषणा केल्यावर मुख्यमंत्री आपल्यावर टीका करत असल्याचा उल्लेख करत पवार म्हणाले, “ही सेवा कुणाच्या घरची नाही, ती जनतेची आहे.
जनतेला त्याचा लाभ मिळावा, यासाठीच आपण ही घोषणा केली आहे.” या वेळी आमदार माऊली कटके, माजी आमदार अशोकबापू पवार, शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग््रेासचे उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.