Pune News : संक्रांतीपासून उबदार वातावरण, किमान तापमानात वाढ होणार

किमान तापमान बुधवार (दि.१४) संक्रांतीपासून हळूवार वाढणार असल्याचा अंदाज
Pune News : संक्रांतीपासून उबदार वातावरण, किमान तापमानात वाढ होणार
Published on
Updated on

पुणे : राज्यात थंडीचा कडाका सोमवारपासूनच कमी होण्यास सुरुवात झाली असून, किमान तापमान बुधवार (दि.१४) संक्रांतीपासून हळूवार वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

रविवारपर्यंत राज्यात चांगलाच गारठा होता. मात्र, सोमवारी किमान तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ झाल्याने सायंकाळी ७ ते ९ या वेळेत जाणवणारा गारठा कमी होण्यास सुरुवात झाली. उत्तरेतून येणाऱ्या शीतलहरीचा प्रभाव कमी होण्यास किमान एक आठवडा लागणार आहे. दरम्यान, किमान तापमानात १४ जानेवारीपासून हळूवार घट होईल असे संकेत आहेत.

सोमवारचे किमान तापमान

गोंदिया ९.५, पुणे १०.९, अहिल्यानगर १०.३, जळगाव १०.७, कोल्हापूर १९.४, महाबळेश्वर १४.१, मालेगाव १०, नाशिक ११.४, सांगली १९.९, सातारा १३.९, सोलापूर १९.३, मुंबई २१, रत्नागिरी २२, छ. संभाजीनगर १२, परभणी १४.२, अकोला १३.७, अमरावती १२.५, नागपूर १०.२

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news