AI Reels Pudhari
पुणे

AI Reels Trend: एआय रील्सची सोशल मीडियावर धूम; तरुणाईमध्ये नवा डिजिटल ट्रेंड

इन्स्टाग्राम-फेसबुकवर पर्यटन, फूड, फॅशनसह विविध विषयांवरील एआय रील्स व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: जम्मू-काश्मीरमधील निसर्गसौंदर्य दाखविणारे, केरळमधील समुद्रकिनाऱ्यावरील रील्स असो वा एखाद्या खाद्यपदार्थांचे वैशिष्ट्‌‍य सांगणारे अन्‌‍ अगदीच कलेवर आधारित एआय रील्स असो... असे रील्स इन्स्टाग््रााम, फेसबुक पाहताना नजरेस पडत असतील... सध्या अशाच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या रील्सची धूम असून, तरुणाईकडून आता एआयद्वारे तयार केलेले रील्सही इन्स्टाग््रााम, फेसबुकवर अपलोड केले जात आहेत.

पर्यटन, फूड, कलासंस्कृती, विनोदी, राजकारण आदी विषयांवर आधारित एआय रील्सचा बोलबाला आहे. त्यामुळेच एआयचे विविध ॲप वापरून रील्स तयार केले जात असून, त्यात पर्यटनावरील रील्सची संख्या मोठी आहे. एआय रील्स सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय, हे आता केवळ तंत्रज्ञानापुरते मर्यादित राहिलेले नाही; तर ते थेट सोशल मीडियावरील कंटेंटनिर्मितीतही मोठी भूमिका बजावताना दिसत आहे. विशेषतः रील्स तयार करण्यासाठी एआयचा वापर वाढताना दिसत आहे.

सध्या एआय रील्स हा नवा ट्रेंड मोठ्या वेगाने लोकप्रिय होत आहे. आज अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी, इन्फ्लुएन्सर्स तसेच छोटे व्यावसायिक एआयच्या मदतीने रील्स तयार करीत आहेत. यामुळे वेळ, मेहनत आणि खर्च वाचत असून, त्यांच्या या रील्सच्या प्रयोगाला प्रतिसादही मिळत आहे. उदा. : काश्मीरमधील पर्यटनावर आधारित रील्समधून आपण जणू काश्मीरमध्येच आहोत, याची अनुभूती मिळते. विशेषतः तरुणाईमध्ये एआय रील्सची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. करिअर मार्गदर्शन, जीवनाबद्दल प्रेरणा देणारे, मार्ग दाखविणारे रील्स, फॅशन, ट्रॅव्हल, फूड अशा विविध विषयांवर एआय रील्स तयार केल्या जात आहेत.

इन्स्टाग््रााम, फेसबुक, यू-ट्यूब या सोशल मीडिया व्यासपीठावर असे रील्स मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. याविषयी प्रणव तावरे म्हणाला, मी एआयच्या साहाय्याने लहान व्हिडीओ तयार करून ते इन्स्टाग््राामवर अपलोड करतो. खास करून पर्यटनावर आधारित असे रील्स मी तयार करीत आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. माझ्यासारखे अनेक तरुण रील्ससाठी एआय वापर करीत आहेत आणि हा ट्रेंड सध्या वाढत आहे.

एआय रील्समुळे हे घडतेय...

एआय रील्स म्हणजे एआयवर आधारित ॲपच्या मदतीने आपोआप तयार होणारे छोटे व्हिडिओ. मोठे बँड्‌‍स, छोटे व्यावसायिक एआय रील्सच्या मदतीने जाहिराती, सवलती आणि प्रॉडक्टच्या प्रसिद्धीचे व्हिडिओ तयार करीत आहेत. कमी खर्चात प्रभावी जाहिरात मिळत असल्याने डिजिटल मार्केटिंग अधिक मजबूत होत आहे. एआय वापरणे आता सोपे झाल्याने ग््राामीण भागातील तरुणही अशा रील्सनिर्मितीकडे वळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT