Pune Theft Pudhari Photo
पुणे

Agriculture Pump Cable Theft: येडगाव परिसरात कृषी पंप केबल चोरीचे सत्र पुन्हा सुरू

30 ते 40 शेतकऱ्यांचे सात ते आठ लाखांचे नुकसान; पोलिसांकडून ठोस कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नारायणगाव : येडगाव परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या केबल चोरी जाण्याचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. रविवारी मध्यरात्री सुमारे 30 ते 40 शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या केबल चोरट्याने चोरून नेऊन शेतकऱ्यांचे सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान केले आहे.

दरम्यान दरवर्षीच्या परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या केबल चोरी जात आहेत परंतु पोलिसांना मात्र या चोरांचा शोध लागत नाही, अशी व्यथा येथील शेतकरी शरद मेहरकर यांनी व्यक्त केली आहे.\

येडगाव धरणाजवळ इंदिरानगर परिसरामध्ये शेतकऱ्यांचे धरणाच्याकाठी कृषी पंप आहेत. काही शेतकऱ्यांची एकत्रित सिंचन योजना आहे. दरवर्षी या भागातील शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या केबल चोरीचे प्रकार होत आहेत. प्रत्येक वेळी केबल चोरी गेली की शेतकऱ्यांनी नवीन केबल आणून बसवायची व पुन्हा केबलची चोरी होते असा प्रकार गेल्या चार पाच वर्षापासून सुरू आहेत. या केबलचोरीमुळे या परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. पोलीस यंत्रणेने या चोरांचा तातडीने शोध लावावा अशी या परिसरातील शेतकरी वर्गाची मागणी आहे.

अनेकदा पोलीस ठाण्यात तक्रार करूनही त्याचा पुढे तपास लागत नसल्यामुळे शेतकरी तक्रारी करण्याबाबत धजावत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर बळीराजांनी करायचं काय? शेतामध्ये पिकवलेल्या पिकाला बाजार भाव योग्य मिळत नसल्याने शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात सापडला आहे आणि त्यात केबल चोरीची भर पडल्यामुळे बळीराजाची अर्थकारण पूर्णपणे कोलमडून जात आहे.

दरम्यान हे केबल चोर मध्यरात्रीनंतर अथवा पहाटेच्या वेळी कृषी पंपाच्या केबल चोरून नेते आहेत. ओके बोल नंतर जाळून त्यातील तांब्याची तार विक्री केली जात आहे. जुन्नर तालुक्यामध्ये या तांब्याच्या तारा कुठे विक्री होतात याचा शोध पोलिसांनी घेणे गरजेचे आहे.या परिसरात केबल चोरी करणारे चोरटे चटावलेले असून आपल्यावर कोणतीच कारवाई होत नाही याची त्यांना खात्री झाल्याने असे प्रकार दरवर्षी घडत आहेत. गुन्हे अन्वेषण विभागाने या शेतकऱ्यांच्या केबल चोरीचा छडा लावून शेतकऱ्यांना मनस्ताप देणाऱ्या चोरट्यांना अद्दल घडवावी अशी मागणी या परिसरातील त्रस्त शेतकरी व्यक्त करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT