पुणे : आदर्शकुमार मोदी यांनी पुणे आयकर विभागाच्या प्रधान मुख्य आयुक्तपदाचा कार्यभार २२ डिसेंबर रोजी स्वीकारला आहे.या सोबतच त्यांच्याकडे नागपूर आयकर विभागाचे प्रधानमुख्य आयुक्त (अतिरिक्त कार्यभार ) ही जबाबदारी देखील आहे.त्यांना आयकर प्रशासनातील तीन दशकांपेक्षा जास्त अनुभव आहे.
मोदी हे भारतीय महसूल सेवेच्या1990 बॅचचे अधिकारी असून त्यांनी क्षेत्रीय पदस्थापना तपास, दक्षता या विविध महत्त्वाच्या क्षेत्रांत कार्य केले आहे. या पदभारापूर्वी ते केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ ( सीबीडीटी ) येथे महानिदेशक (आयकर-दक्षता) तसेच मुख्य दक्षता अधिकारी म्हणून कार्यरत होते.
मोदी यांनी 2012 ते 2019 या कालावधीत पुणे आयकर विभागात महत्त्वाची सेवा बजावली आहे. या काळात त्यांनी आयकर आयुक्त (विभागीय प्रतिनिधी), आयकर अपीलीय न्यायाधिकरण आयकर आयुक्त (अपील) तसेच आयकर आयुक्त (डीडीएस ) ही पदे भूषवली.
त्यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची विशेष आवड आहे.त्यांच्या या नियुक्तीमुळे पुणे आयकर विभागात कार्यक्षम, पारदर्शक व न्याय कर प्रशासन अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.