पुणे : पुढारी वृत्तसेवा
गुंड निलेश घायवळ टोळीतील साथीदार आणि मोक्क्यातील फरारी आरोपीला युनीट तीनने अटक केली. त्याला कोथरूड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. समीर बाळु खेंगरे (वय 24 रा. आशिष गार्डन चौक,कोथरुड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
गुन्हे शाखा युनीट तीनचे पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी घायवळ टोळीतील सराईत आणि मोक्क्यातील फरारी समीर खेंगरे कर्वेपुतळा परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस अमलदार राकेश टेकावडे यांना मिळाली. पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, उपनिरीक्षक तेजस्वी पवार, महेश निंबाळकर, राकेश टेकावडे, दिपक क्षिरसागर, भाग्यश्री वाघमारे, सुजीत पवार यांनी केली.