Land Scam Pudhari
पालघर

Talasari Kajali Cooperative Land Scam: तलासरीतील काजळी सहकारी संस्थेचा 7 कोटींचा भूखंड कवडीमोलात; सात जणांवर गुन्हा दाखल

लेखापरीक्षण अहवालातून 70 लाखांत विक्रीचा प्रकार उघड; अडीच महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

तलासरी : तलासरी तालुका अंतर्गत काजळी सामुदायीक शेती सहकारी संस्था मर्या, काजळी (ता. तलासरी जि. पालघर) संस्थेमध्ये 2016-17 ते सन 2022-23 या कालावधीच्या वैधानिक लेखा परिक्षण अहवालातून संस्थेने 7 कोटींची जमीन अवघ्या 70 लक्ष रु. मधून विकून अपहार केला असल्याचे लेखा परीक्षण अहवाला वरून उघड झाले होते.या घोटाळ्याप्रकरणी अखेर सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दैनंदिन पुढारी वृत्तपत्रात 11 डिसेंबर 2025 रोजी तलासरी सामुदायक सहकार संस्थेचा भूखंड विकला, गुन्हा नोंद करण्याची सूचना असे वृत्त प्रसिद्ध करण्यात करण्यात आले होते. तसेच या संदर्भात पुढारीचा वारंवार पाठपुरावा सुरू होता. अखेर अडीच महिन्यानंतर भूखंड घोटाळ्याप्रकरणी सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलासरी पोलीस ठाण्यात संबंधित प्रकरणात अहवालाच्या अनुषंगाने तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

काजळी सामुदायिक शेती सहकारी संस्था या सहकारी संस्थेत संस्थेच्या तत्कालीन अध्यक्ष व त्यांच्यासह असलेल्या इतर सहकाऱ्यांनी मिळून संगणमताने कटकारस्थान करून संस्थेचे नुकसान व फसवणूक करून स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी अपहार केल्याची बाब समोर आली होती. सहकार संस्थेमधील कामकाज सुरळीत व दोष सदृश्य आढळून आल्याने सामुदायिक शेती सहकारी संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 102/2 नुसार अवसायनात घेण्यात आली होती. संस्थेच्या वैद्यानिक लेखापरीक्षण करतेवेळी संस्थेमध्ये अपहार व फसवणूक दोषाबाबत कारवाई करण्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. अहवालामध्ये तत्कालीन पदाधिकारी यांनी संस्थेची

70 लाखाची अफरातफर करत संस्थेची व सभासदांच्या अन्यायाने व विश्वासघात करून अपहार केल्याचे स्पष्ट करण्यात आले असून करोडोचा भूखंड कवडीमोल भावात विक्री केल्याचे अहवालातून स्पष्ट झाले होते. लेखापरीक्षण अहवालाच्या अनुषंगाने संस्थेची कवडीमोल भावात भूखंड विक्री प्रकरणी अखेर तत्कालीन अध्यक्ष उपेंद्र रामजी रॉय, उपाध्यक्ष रामजी रामचंद्र रॉय तसेच मंडळातील रविंद्रकुमार हरिजन,निमिष कीर्तिकुमार शहा, मेहुल रणजितसिंह ठाकूर, आणि अवसायक उमाजी नानाजी चेटुले, तत्कालीन सहाय्यक निबंधक अजय गुजराथी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT