Palghar Temperature Rise: पालघर जिल्ह्यात तापमान वाढीचा इशारा; 35 अंशांपर्यंत पारा जाण्याची शक्यता

कोकणात उष्ण-दमट हवामानाचा अंदाज; आंबा, काजू व भाजीपाला पिकांसाठी कृषी विभागाच्या सूचना
Palghar Temperature Rise
Palghar Temperature RisePudhari File Photo
Published on
Updated on

पालघर शहर : पालघर जिल्ह्यात पुढील काही दिवसांत हवामानात बदल होणार असन तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईने दिलेल्या अंदाजानुसार, जिल्ह्यात पुढील तीन दिवस उष्ण व दमट वातावरण राहील. 3 आणि 4 मार्चनंतर तापमानात अधिक वाढ होऊन कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

Palghar Temperature Rise
Tarapur MIDC Gas leak: तारापूर औद्योगिक वसाहतीत पुन्हा वायू गळती; कामगारांची पळापळ, 100 जणांना त्रास

कोकण विभागात 5 ते 11 मार्च दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त, तर किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्णतेमुळे फळबागा, उन्हाळी पिके आणि रोपवाटिकांमधील बाष्पीभवनाचा वेग वाढणार असून, पिकांना पाण्याचा ताण बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.दरम्यान सकाळी जास्त आर्द्रता आणि दुपारी वाढणारे तापमान यामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव जलद गतीने होऊ शकतो.

Palghar Temperature Rise
Palghar Water Supply: पालघर पूर्व भागात पाणीबाणी; सूर्या जलवाहिनी दुरुस्ती लांबल्याने आठवडाभर पाणीपुरवठा ठप्प

भात पिकाची पुनर्लागवड होऊन 20-25 दिवस झाले असल्यास बेणणी करून घ्यावी आणि पाण्याची पातळी 2.5 ते 5 सेंमीपर्यंत मर्यादित ठेवावी. भुईमुगाचे पीक 45 दिवसांपर्यंत तण विरहित ठेवावे. आंबा आणि काजू: उष्णतेमुळे आंबा आणि काजूची फळगळ होण्याची शक्यता आहे. झाडांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसांतून एकदा पाणी द्यावे. आंबा फळमाशीच्या नियंत्रणासाठी रक्षक फळमाशी सापळा एकरी 2 या प्रमाणात लावावा. काजू कलमांच्या आळ्यात पालापाचोळ्याचे आच्छादन करावे. चिकू बागेत तण व्यवस्थापन करून आच्छादनाचा वापर करावा.

Palghar Temperature Rise
Mokhada Father Murder: मोखाड्यात खळबळ! पांगरीत मुलाकडून जन्मदात्या पित्याची कुऱ्हाडीने हत्या

केळीच्या बागेत हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी आणि फुलकिडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी करावी. भाजीपाला व फुलशेती: मिरची, टोमॅटो आणि वांगी पिकावर तुडतुडे व फुलकिडीचा प्रादुर्भाव झाल्यास 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. मोगरा आणि सोनचाफा बागेला गरजेनुसार नियमित पाणी द्यावे. असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र, कोसबाड हिल मार्तफतजिल्हा कृषी हवामान केंद्र, कोसबाड हिल पालघरमार्फत शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news