बांबू लागवड (File Photo)
पालघर

Palghar Environment News |बांबूलागवडीमुळे पालघर पर्यावरणीयदृष्ट्या समृद्ध होणार

Bamboo Farming Palghar | पालघर जिल्ह्याला मिळणार नवी ओळख; रोजगार निर्मितीत होणार वाढ

पुढारी वृत्तसेवा
विश्वनाथ कुडू

Bamboo Farming Palghar

खानिवडे : पालघर जिल्ह्यात होणाऱ्या बांबू लागवडीमुळे जिल्हा आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय आणि बांबू कलेच्या वस्तूंनी समृद्ध होणार आहे. या लागवडीमुळे रोजगार निर्माण होण्यासही मदत होणार आहे. बांबू लागवडीच्या मोहिमेमुळे पालघर जिल्हा प्राणवायू निर्मितीत वरचढ ठरेल असा विश्वास व्यक्त होत आहे. अलीकडेच पाशा पटेल यांच्या पालघर दौऱ्यादरम्यान बांबू लागवडीचे महत्वपूर्ण अभियान जिल्हाभर सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे बांबू लागवडीतून पालघर येत्या काळात बांबू समृद्ध पालघर म्हणून ओळखला जाणार आहे.

कोकणातील न परवडणाऱ्या शेतीला बांबू लागवड हा उत्तम पर्याय आहे. बांबू लागवडिमुळे परिसरातील जिल्ह्याना प्राणवायू उपलब्ध होणार असून निसर्गाला पूरक हिरवळ निर्माण होणार आहे. बांबूच्या जंगलामुळे जैवविविधता टिकण्यास व संवर्धनासाठी मदत होणार आहे. मानवासाठी प्रतीवर्ष किमान २८० किलो इतका प्राणवायू आवश्यक आहे. एका वर्षात एक बांबू तेवढाच कार्बन शोषून घेण्याचे काम बांबू करतो. त्यामुळे पर्यावरणीय संतुलन राखण्याचे काम बांबूच्या माध्यमातून होते. त्यासाठी सरकारकडून हेक्टरी सात लाखांचे अनुदान मजुरी व बांबू लागवडीच्या खड्ड्यासाठी मिळत आहे. त्यातून रोजगाराची साखळी निर्माण होते.

२० वर्षांपूर्वी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हापूस आंबा आणि काजूचे पिक सोडून बांबूचे पीक स्वीकारले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग मधले बांबू उत्पादक शेतकरी स्वयंपूर्ण झाले आहेत. हाच पॅटर्न समान भौगोलिक परिस्थिती असलेल्या पालघरमध्ये देखील यशस्वी करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. या बांबू लागवडीसाठी पालघर जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणा समन्वयाने काम करत असून बांबू लागवड इच्छुक शेतकऱ्यांच्या आलेल्या अर्जावर तातडीने प्रक्रिया करून बांबू लागवडीचे स्वतंत्र अनुदान आणि शेततळ्याचे स्वतंत्र अनुदान अशा पद्धतीने शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे.

बांबू लागवड ही अनेक कारणांमुळे अत्यंत आवश्यक आणि फायदेशीर ठरते. तो मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड शोषतो आणि ऑक्सिजन निर्माण करतो. बांबूची मुळे ही जमिनीत खोलवर जातात, त्यामुळे धूप रोखली जाऊन मृदा संरक्षण होते. बांबू मळे भुगर्भातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यास मदत होत असल्याने जलसंवर्धन होते. बांबू ही जगातील सर्वात वेगान वाढणारी वनस्पत्ती आहे. बांबूच्या काही प्रजाती दररोज १ मीटरपेक्षा जास्त वाढतात, बांबूपासून तयार करण्यात येणारे फर्निचर, कागद, वत्रे, बांधन साहित्य, अगरबत्ती, तसेच हस्तकलेतून निर्माण होणाऱ्या शोभेच्या वस्तूंचा कच्चा माल हा बांबू उत्पादनातून मिळतो. शाश्वत शेतीचे उत्पत्र म्हणजे शेतकऱ्यांना सतत उत्पन्न देणारी शेती म्हणून बांबू शेती अत्यंत फायदेशीर तरते. बांबू लागवड ३०-५० वर्षापर्यंत उत्पादन देते.

कोकणातील भात शेती आता परवडण्यासारखी राहिली नाही

पारंपरिक शेती करून शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही, तसेच काही शिल्लक देखील राहत नाही. त्यामुळे आता शहरी लोकांसाठी ऑक्सिजन निर्माण करणारा बांबू अधिक सरकारचे अनुदान आणि बांबू पासून निर्माण होणाऱ्या २००० पर्यावरणपूरक व आकर्षक निरनिराळ्या शोभेच्या तसेच गृहपयोगी वस्तु आगामी काळात सर्व बांबू उत्पादक शेतकऱ्यांचे आयुष्य परिवर्तित करणाऱ्या ठरणार आहेत. यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात बांबू आधारित उद्योगांच्या निर्मितीसाठी राज्य सरकारने ४३०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याचबरोबर प्रस्तावित स्किल टेक विद्यापीठाच्या माध्यमातून बांबू उद्योगांमधील कौशल्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम देखील हाती घेण्यात येणार आहेत.

बांबूच्या प्रजाती

भारतात १३६ पेक्षा अधिक बांबू प्रजाती आहेत. यापैकी सुमारे १९ प्रजाती व्यावसायिकदृष्ट्‌या महत्वाच्या आहेत. यातील डेंड्रोकलमस स्ट्रीकट्स या प्रजातीची सर्वाधिक लागवड केली जाते. बांबूसा बा, बांबूसा बलगरिस, बांबूसा टूलडा, बांबूसा बालकुवा या प्रमुख प्रजाती आहेत. आपल्या महाराष्ट्रात सुमारे १० ते १२ बांबू प्रजाती आढळतात. यामध्ये Dendrocalamus strictus माले बांबू म्हणून ओळखला जातो. Bambusa bambos कोंडाल बांबू म्हणून ओळखला जातो, ही प्रजात गडचिरोली, नंदुरबार, गोंदिया, आणि चंद्रपूर जिल्ह्यांत बांब जंगलात मोठ्या प्रमाणावर आढळते. तर जग भरात १५०० पेक्षा अधिक बांबू प्रजाती आहेत. सर्वात जास्त प्रजाती ह्या आशिया खंडातील चीन, भारत, थायलंड, म्यानमार मध्ये असून चीनमध्ये सुमारे ५०० हुन अधिक प्रजाती आढळतात, तसेच ब्राझील, कोलंबिया, आफ्रिका, आणि इतर उष्णकटिबंधीय देशांमध्येही प्रजाती आढळतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT