

माथेरान : माथेरानच्या पर्यावरणावर घोड्यांचा परिणाम होत असल्याची तक्रार हरित लवादाकडे दाखल झाली आहे. त्या अनुषंगाने पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यावरण संस्था अभ्यास करुन अहवाल सादर करणार आहे.
सामाजिक कार्यकर्ते सुनिल शिंदे व ई रिक्षा चालक केतन रामाणे यांनी हरित लवाद, पुणे बेंच येथे दाखल केलेल्या याचिकेवर २३ डिसेंबर रोजी सुनावणी झाली. घोड्यांमुळे माथेरानच्या पर्यावरणाचा होणार हास थांबवण्यासाठी विविध उपाययोजना सुचविण्यासाठी २५ ऑक्टोबर रोजी हरित लवादाने तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती. या संयुक्त कामिटीमध्ये पर्यावरण खात्याचे डॉव थिरूनवुकर, मुख्याधिकारी राहुल इंगळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोडीच्या विभागीय अधिकारी ऋतुजा भालेराव यांनी नोव्हेंबर महिन्यात माथेरानच्या विविध भागाची पाहणी केल्यानंतर घोड्यांच्या परिणामांचे गांभिर्य पाहता पर्यावरणचा ऱ्हास थांबविण्यासाठी पर्यावरणातील तज्ञ संस्थेची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. संयुक्त समितीने पाच संस्था सोबत चर्चा केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञ संस्था माणगाव रायगड, फर्ग्युसन महाविद्यालय पुणे, वीर जिजामाता संस्था मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे व भारती विद्यापीठ पुणे यांच्या सोबत सविस्तर चर्चा केल्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर या संस्थेचा अनुभव पाहता त्यांच्या कडे जबाबदरी देण्याचा निर्णय संयुक्त समितीने घेतला.
या अभ्यासासाठी हरीत लवादाने तीन महिन्यांची मुदत दिल्याने पुढील सूनवाई १५ एप्रिल रोजी ठेवली आहे. तत्पूर्वी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने माथेरानचे पर्यावरण अबाधित रहावे यासाठी फेब्रुवारी २००३ मध्ये माथेरानला पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित केले आहे माथेरानचा एकूण परिसर ७.२ स्क्वेर किमी इतका आहे ७० टक्के परिसर वनराईने व्यापला आहे. घोडा झाडाच्या संपर्कात आल्याने अनेक झाडे मेली आहेत त्यामुळे पर्यावरणाची विपरीत हानी होते. पर्यावरण खात्यातर्फे शुभम राठोड व राहुल गर्ग तर प्रदूषण नियंत्रण बोर्डा तर्फे मानसी जोशी व पूजा नातू तसेच याचिकाकर्ते यांच्य कडून तुषार कुमार यांनी युक्तिवाद केला.