Economic Fraud Pudhari
पालघर

Boisar Investment Fraud: बोईसरमध्ये ‘रिच टू मनी’ कंपनीचा कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा

शेअर मार्केटमधील मोठ्या परताव्याचे आमिष; पालघर पोलिसांनी मालकाला अटक

पुढारी वृत्तसेवा

पालघर : बाबासाहेब गुंजाळ

लोकांना शेअर मार्केटमधील मोठ्या परताव्याच्या मोहजाळ्यात अडकवून फसवणारे कमी नाही. 2021 पासुन बोईसर येथे रोशन जैन याने रिच टू मनी नावाने कंपनी सुरू केली. लोकांना स्वप्न दाखवून पैसे घेतले. आता पळून जाण्याची वेळ आली. मात्र पालघर पोलिसांनी त्याच्या आतच मुसक्या आवळल्या.

रोशन जैन याने रिच टू मनी ह्या कंपनीने देखील लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. पालघर जिल्ह्यात सध्या लोकांना दर महिन्याला जास्त दराने परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांना गुंतवणूक कारण्यास भाग पाडले जाते.

3 ते 4 महिने त्यांना परतावा देऊन त्यांच्या मार्फत इतर लोकांना पैसे गुंतवायला सांगितले जाते. पुढे जास्त पैसे गोळा झाल्यावर कोणालाही पैसे परत दिले जातं नाही. शेअर मार्केट मध्ये फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवल्याचे सांगितले जाते.

या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात रोशन जैन या मालकाविरोधात महाराष्ट्र एमपीआयडी म्हणजे महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण कायदा 1999 कलम 3 व 4 तसेच भारतीय दंड न्याय संहिता कलम दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT