नाशिक; पुढारी वृत्तसेवा : येथील भांडी बाजार येथे हाॅटेल कामगाराचा खून झाल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. अनिल गायधनी (वय ५०) असे खून झालेल्याचे नाव आहे. हाॅटेल कामगाराचा खून झाल्याप्रकरणी पाेलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
अनिल गायधनी हे एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत होते. त्यांना घरी येण्यासाठी वेळ होत होता. बुधवारी ते कामावरून घरी परतात असताना खून झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले .
गुरूवारी (दि.९) रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भांडी बाजार येथील रामसेतू पूल परिसरातील राजहंस दुकानाजवळ अनिल गायधनी याचा मृतदेह आढळून आला. यानंतर सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली.
यानंतर सरकारवाडा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत शुभम मोरे या संशयितास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचलंत का?
पाहा व्हिडिओ : इतक्या प्रकारचे शाईचे दौत कधी पाहिलेत का?