उत्तर महाराष्ट्र

नाशिक : चारचाकीची दुचाकीला जोरदार धडक, युवक ठार

गणेश सोनवणे

नाशिक : दुचाकी अपघातात युवक ठार झाल्याची घटना नाशिक – पुणे महामार्गावरील पळसेजवळ घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक श्रीनिवास मोरे (१६, रा. हरिओम प्लाझा, जीएमडी कॉलेजमागे, सिन्नर) हा वडिलांसोबत दुचाकीने घरी परतत होता. पळसे गावाजवळ अज्ञात चारचाकीने मोरे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

यात गंभीर जखमी झालेल्या विवेकला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT