MHA Awards : महाराष्ट्राच्या 11 पोलीस कर्मचार्‍यांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’! | पुढारी

MHA Awards : महाराष्ट्राच्या 11 पोलीस कर्मचार्‍यांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’!

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातील 151 पोलीस कर्मचार्‍यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून तपासात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री पदक 2022 प्रदान करण्यात आले. या 151 पोलिसांमध्ये सीबीआयचे 15, महाराष्ट्रातील 11, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील 10-10, करेल राजस्थान आणि पश्चिम बंगालमधील 8-8 पोलिसांचा समावेश आहे. यात 28 महिला पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय इतर राज्यांतील पोलिसांनाही तपासातील उत्कृष्टतेचे गृहमंत्री पदक प्रदान करण्यात आले.

यंदा महाराष्ट्रातील 11 पोलिसांचा गौरव

कृष्णकांत उपाध्याय – डेप्युटी सीपी महाराष्ट्र
प्रमोद भास्करराव तोरडमल – निरीक्षक
मनोज पवार – सहाय्यक पोलीस निरीक्षक
दिलीप शिशुपाल पवार – पोलीस निरीक्षक
अशोक तानाजी विरकर – SDPO महाराष्ट्र
अजित भागवत पाटील – SDPO महाराष्ट्र
राणी तुकाराम काळे – सहाय्यक पोलीस निरीक्षक
दीपशिखा दीपक मावर – पोलीस निरीक्षक
सुरेशकुमार नरसाहेब राऊत – पोलीस निरीक्षक
जितेंद्र बोडप्पा वनकोटी – पोलीस निरीक्षक
समीर सुरेश अहिरराव – पोलीस निरीक्षक

2018 पासून पदके दिली जात आहेत

कोणत्याही गुन्ह्याच्या तपासात उच्च मापदंड प्रस्थापित करून कर्तव्यनिष्ठा आणि कामात असाधारण धाडस दाखविणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना 2018 पासून हे पदक देण्यात येत आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे हा या पदकाचा उद्देश आहे. 2018 मध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पोलिसांना प्रोत्साहन देण्यासाठी पाच पोलिस पदके सुरू केली होती. यामध्ये स्पेशल ऑपरेशन्स मेडल, पोलिस इंटरनल सिक्युरिटी सर्व्हिस मेडल, एक्स्ट्राऑर्डिनरी स्किल्स मेडल, उत्कृष्ठ आणि अति उत्कृष्ट सेवा मेडल आणि मेडल ऑफ एक्सलन्स इन इन्व्हेस्टिगेशन यांचा समावेश आहे.

2020 मध्ये 121 पोलिसांना पदके प्रदान

2020 मध्ये 121 पोलिसांना केंद्रीय गृहमंत्री पदक ऑफ एक्सलन्स इन इन्व्हेस्टिगेशन प्रदान करण्यात आले. यामध्ये 15 सीबीआयचे, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रचे 10-10, उत्तर प्रदेशचे आठ, केरळ आणि पश्चिम बंगालचे सात आणि उर्वरित इतर राज्य केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांचा समावेश होता. यामध्ये 21 महिला पोलिसांचा समावेश होता.

Back to top button