उत्तर महाराष्ट्र

जल जीवन मिशनमुळे 40 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार – डॉ. भारती पवार

गणेश सोनवणे
नाशिक (कळवण) पुढारी वृत्तसेवा : सकाळी उठल्या पासून पाण्यासाठी सुरु होणारा महिलांचा खडतर प्रवास थांबविण्यासाठी त्यांच्या डोक्यावरील हंडा कायमचा उतरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल शक्ती मंत्रालयाची स्थापना करून त्याला करोडो रुपयांचा निधी दिला व जलजीवन मिशन सुरु करून हर घर जल, हर घर नल संकल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. त्यामुळे तालुक्यातील जवळपास ४० गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.
तालुक्यातील ४० गावातील जलजीवन मिशन अंतर्गत ४३ कोटी ५० लाखांच्या पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन शुभारंभ केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे हस्ते अभोणा येथे करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्रांतअधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना, तहसीलदार बंडू कापसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी, कार्यकारी अभियंता पी. सी भांडेकर, गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्री ना. पवार बोलत होत्या.
पुढे बोलतात पवार म्हणाल्या की, केंद्र शासनातर्फे गोरगरीब जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरु आहेत. यात प्रधानमंत्री आवास योजना, जण धन योजना, उज्वला गॅस योजना, कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, कृषी सन्मान योजना, कांदाचाळ योजना अशा अनेक योजना सुरु आहे. त्याचा लाभ देशातील करोडो गरजूना मिळत आहे. तसेच कोविड काळात केंद्र शासनाने महिलांच्या जनधन खात्यावर ५०० रुपयांची मदत दिली आहे. याच काळात प्रत्येक गरजूला शिधा पत्रिकेवर मोफत धान्य वाटप केले आहे.  या योजनांची माहिती जनतेला व्हावी यासाठी मी देश भर फिरत आहे. तशीच माझ्या तालुक्यात आली आहे, असे त्या म्हणाल्या.
मात्र विरोधकांच्या डोळ्यात ही बाब खुपली असून त्यांनी बॅनर लावण्यावरून कार्यकर्त्यांशी वाद घातला आहे. सोशल मीडियावर पोस्ट फिरवत आहे. त्यामुळे मी घाबरेल असे कोणाला वाटत असेल तर तो त्यांचा गोड गैरसमझ आहे. कारण हम डरने वालो मेसे नाही है, डराणे वालोमेसे है, म्हणतात ना छोटे मनसे कोई बडा नही होता. और टूटे मनसे कोई खडा नाही होता. त्यामुळे मोदीचे केंद्र सरकार जनतेसाठी काय काम करीत आहे. हे आम्ही जनतेला वेळोवेळी सांगणारच असे ठासून सांगत विरोधकांवर त्यांनी हल्लाबोल  केला.  यावेळी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष एन. डी. गावित, माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दिपक खैरनार, उपजिल्हाध्यक्ष सुधाकर पगार, शहराध्यक्ष निंबा पगार, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष हितेंद्र पगार, सुनील खैरनार, गोविंद कोठावदे, सतीश पगार, एस. के. पगार, हेमंत रावले, चेतन निकम, चंद्रशेखर जोशी, कृष्णकांत कामळस्कर, प्रवीण रोंदळ, आशुतोष आहेर, हेमंत पगार, हरिश्चंद्र देसाई, स्वीय सहाय्यक रुपेश शिरोडे, महिला अध्यक्ष सोनाली जाधव, अभोणा पश्चिम पट्ट्यातील सरपंच, सदस्य, सोसायटी चेअरमन संचालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोरोना हद्दपार झालेला नाही –
कोरोना पूर्णतः देशातून हद्दपार झालेला नाही. शेजारील प्रगत देशात अजून कोरोनाचा प्रादर्भाव कायम आहे. त्या देशांत लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे आपणही गाफील न राहता काळजी घ्या मास्क वापरा, सोशल डिस्टन्स पाळा असा सल्ला ना. पवार यांनी दिला.
संपूर्ण जिल्ह्यात सरप्राईज व्हिजिट करणार 
जिल्ह्यातील ज्या शासकीय दवाखान्यांबाबत तक्रारी येतील त्या दवाखान्यांना मी रात्री-अपरात्री सरप्राईज व्हिजिट देणार आहे. कारण केंद्र सरकार आरोग्यावर मोठ्या प्रमाणात खर्च करीत आहे. अनेक प्रकारच्या आरोग्य चाचण्या मोफत देत आहे.  त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळतो आहे की नाही ते तपासणार आहे.
श्रेयवादावरून गलिच्छ राजकारण 
केंद्र शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याला कोट्यवधींचा निधी मिळत आहे. माझ्या मतदार संघात दहा तालुके आहेत. प्रत्येक तालुक्यात विविध योजनांचे उद्घाटन होत आहे. मात्र माझ्या तालुक्यात विरोधकांकडून सुरु असलेले गलिच्छ राजकारण कोणत्याच तालुक्यात नाही. काम करा आढावा घ्या. पण कोणाला वेठीस धरून कार्यकर्त्यांशी वाद घालू नका. असा टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT