पणजी : कोरोनामुळे सहा दिवसांत एकही मृत्यू नाही | पुढारी

पणजी : कोरोनामुळे सहा दिवसांत एकही मृत्यू नाही

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोव्यात कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आलेले असले तरी इतर राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्यातही कोरोना बाधित वाढण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर दि. 25 एप्रिल ते 30 एप्रिल या सहा दिवसांत 4198 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. यात 44 नवे कोरोना बाधित सापडले असून 24 कोरोना बाधित बरे झाले आहेत. या काळात एकाही कोरोना बाधिताचा मृत्यू झालेला नाही. दि. 30 रोजी राज्यात 45 सक्रिय कोरोना बाधित होते. हे सर्व बाधित घरी अलगीकरणात राहून उपचार घेत आहेत.

Back to top button