GST recovery : अर्थव्यवस्थेला अच्छे दिन ; १. ६८ लाख कोटींची विक्रमी जीएसटी वसुली | पुढारी

GST recovery : अर्थव्यवस्थेला अच्छे दिन ; १. ६८ लाख कोटींची विक्रमी जीएसटी वसुली

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : सरत्या एप्रिल महिन्यात 1.68 लाख कोटी रुपयांची करवसुली झाली असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाकडून रविवारी देण्यात आली. एका महिन्यातील करवसुलीचा (GST recovery)  हा सर्वकालीन उच्चांक आहे. अर्थव्यवस्थेला चांगले दिवस आले असल्याची प्रतिक्रिया यावर अर्थतज्ञांनी दिली आहे.

गतवर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत सरत्या एप्रिलमध्ये झालेली जीएसटी करवसुली  (GST recovery) 20 टक्क्याने जास्त आहे. विशेष म्हणजे दीड लाख कोटी रुपये करवसुलीचा आकडादेखील यावेळी पहिल्यांदाच ओलांडला गेला आहे. सरत्या एप्रिलमध्ये एकूण जीएसटी करवसुली 1 लाख 68 हजार 540 कोटी रुपये इतकी झाली. त्यातील सेंट्रल जीएसटीचा वाटा 33 हजार 159 कोटी रुपयांचा होता. तर राज्य जीएसटीचा वाटा 41 हजार 793 कोटी रुपये इतका होता. याशिवाय आय-जीएसटीच्या माध्यमातून 81 हजार 939 कोटी रुपयांची करवसुली झाली. आय-जीएसटीमध्ये 36 हजार 705 कोटी रुपयांच्या आयात कराचा व 10 हजार 649 कोटी रुपयांच्या उपकराचा समावेश आहे. याआधी मार्च 2022 सर्वाधिक 1.42 लाख कोटी रुपयांच्या जीएसटी कराची वसुली झाली होती. तो विक्रम आता मागे पडला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button