उत्तर महाराष्ट्र

नाशिक जिल्ह्यातील ‘या गावात’ बिबट्याचा मुक्त संचार ; परिसरात दहशत

गणेश सोनवणे

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा ; जानोरी येथील केंद्रीय संरक्षण प्रकल्पालगत असलेल्या वाघाड कॅनॉलशेजारी परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून, बिबट्याने शेतकर्‍यांचे पाळीव प्राणी फस्त केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

पाळीव प्राण्यांना बिबट्याने फस्त केल्याने रात्रीच्या वेळी शेतात पाणी देण्यासाठी जाणार्‍या शेतकर्‍यांवर बिबट्या हल्ला करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाने परिसरात त्वरित पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. त्याबाबत जानोरीचे उपसरपंच गणेश तिडके यांच्या नेतृत्वाखाली गोविंद वाघ, प्रकाश वाघ, किशोर विधाते, प्रभाकर विधाते, माधव घुमरे यांनी दिंडोरी वनविभागाला निवेदन दिले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT