कोल्हापूर : ‘कोल्हापूर उत्तर’ काँग्रेस की शिवसेनेकडे? | पुढारी

कोल्हापूर : ‘कोल्हापूर उत्तर’ काँग्रेस की शिवसेनेकडे?

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या जागेवर काँग्रेसचा हक्क आहे. परंतु, शिवसेनादेखील आग्रही आहे. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी मुंबईत महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांची प्राथमिक बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढविण्याबाबत चर्चा झाली. मात्र, शिवसेनेने या जागेचा आग्रह सोडलेला नाही. त्यामुळे यासंदर्भात गुरुवारी (दि. 17) पुन्हा मुंबईत बैठक होणार आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आ. चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध करण्याच्?या द‍ृष्टीने चर्चा सुरू होती. परंतु, भाजपने उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केल्?यामुळे बिनविरोधची चर्चा हळूहळू मागे पडत गेली. काँग्रेसच्या वतीने कै. जाधव यांच्?या पत्नी जयश्री जाधव यांचे नाव आहे. राज्यात महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्र आहे. त्यामुळे ‘कोल्हापूर उत्तर’ची पोटनिवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढवावी, असे जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे मत आहे.

यासंदर्भात प्राथमिक चर्चा करण्याकरिता बुधवारी मुंबईत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्?या निवासस्?थानी जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती.बैठकीस पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, उच्?च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आ. प्रकाश आबिटकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव तसेच जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व माजी आमदार उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून प्रारंभ

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. यामुळे दि. 17 पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. दि. 24 मार्चअखेर उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहेत. उमेदवारी अर्जही उद्यापासूनच उपलब्ध होणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शिवाजी सभागृहात सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत अर्ज स्वीकारले जातील. बुधवारी सायंकाळी निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी अधिकारी, कर्मचार्‍यांची बैठक घेतली. अर्ज भरण्यासाठी सहा दिवसांचा कालावधी मिळणार आहे. शुक्रवार (दि. 18), रविवारी (दि. 20) सुट्टी आहे. गुरुवार, दि. 24 पर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

एकत्र लढायला शिवसेना अनुत्सुक?

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ‘कोल्हापूर उत्तर’ची पोटनिवडणूक महाविकास आघाडीच्या वतीने एकत्रपणे लढवूया, असे मत मांडलेे. परंतु, शिवसेना त्याला तयार नसल्याचे समजते. कोल्?हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला चांगला जनाधार असल्याचे विधानसभेच्या गेल्या अनेक निवडणूक निकालांवरून दिसून आले आहे. शिवसेनेची मते काँग्रेसला मिळण्याची शक्यता नसल्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळावी, असा शिवसेनेच्या नेत्यांनी आग्रह धरल्याचे सूत्रांनी सांगितले. या जागेचे दावेदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर बैठकीस उपस्थित नव्हते. त्यामुळे गुरुवारी (दि. 17) दुपारी साडेबारा वाजता पुन्हा ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत ‘कोल्हापूर उत्तर’ची जागा काँग्रेसला की शिवसेनेला, यावर निर्णय होणार असल्याने बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

‘आप’चे पक्षश्रेष्ठी कोल्हापुरात

‘उत्तर’च्या पोटनिवडणुकीसाठी आम आदमी पक्ष लढणार आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे कोल्हापूर दौर्‍यावर आले आहेत. राचुरे यांनी पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन ‘उत्तर’मधील तयारीचा आढावा घेतला. उमेदवाराबाबत दिल्लीतून घोषणा होईल, असे राचुरे यांनी सांगितले.पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांच्यासह एका माजी महापौर व माजी नगरसेविकेनेही पक्षाकडे उमेदवारी मागितल्याचे समजते.

Back to top button