उत्तर महाराष्ट्र

…त्याचदिवशी शिवसेनेचे हिंदुत्व फिके पडले : रावसाहेब दानवे

अविनाश सुतार

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : ज्या दिवशी राज्यातील जनतेने शिवसेना व भाजपला सरकार बनवण्याचा जनादेश दिला होता. त्याचदिवशी त्यांनी आमच्याशी दगाफटका करून राष्ट्रवादी व काँग्रेससोबत युती केली. त्याच दिवशी त्यांचे हिंदुत्व फिके पडले, अशी टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर केली.

मंत्री दानवे यांनी आज (रविवार) भाजप आमदार गिरीश महाजन यांच्या कन्येच्या लग्नाला उपस्थिती लावली. त्यानंतर  पत्रकारांशी बोलताना ते म्‍हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वावर कोणीही शंका घेण्याचे कारण नाही. नबाब मलिकसारखा दाऊद इब्राहिम सारख्या माणसाची  प्रॉपर्टीची देखभाल करीत होता. त्याला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्यांनी अजूनपर्यंत हात लावलेला नाही. भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी पक्ष आहे, हे सांगायला आम्हाला कोणाचीही गरज नाही आणि संकाेचही नाही. त्यांच्या हिंदुत्वातील आणि आमचे हिंदुत्वातील फरक मी सांगितला आहे, असेही ते म्हणाले.

भविष्यात हे तीन-चार पक्ष कोण कोणासोबत जाईल, हे सांगता येत नाही. मात्र, सर्व जण एकत्र  येऊन भाजपला पराभव करू शकतो, अशी यांची कल्पना आहे, ती कल्पना गोवा,  उत्तराखंड, उत्तर प्रदेश  या ठिकाणी लोकांनी धुळीस मिळवलेली आहे, असे दानवे यावेळी म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : दुष्काळ ते 300 एकर ऊस लागवड करण्याऱ्या हिंगणगावाची गोष्ट

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT