उत्तर महाराष्ट्र

molestation : तरुणीच्या विनयभंग प्रकरणी पीएसआयची तात्काळ बदली !

backup backup

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : धरणगाव शहरामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने तरुणीची छेड ( molestation) काढल्याची घटना घडली, या घटनेची माहिती समजताच संबंधित पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ कंट्रोल रूम बदली करण्यात आली.

शहरातील एका तरुणीची गवारे नामक पीएसआयने 30 रोजी दुपारी 4 ते 4.30 वाजेला  छेड काढली. भेदरलेल्या तरुणीने याची माहिती कुटुंबियांना दिली. यानंतर परिसरातील नागरिक संतप्त झालेत. या पीएसआयने स्वतःला आपल्या घरात कोंडून घेतले. नागरिकांनी पोलिसांना ( molestation) घटना कळविल्यानंतर काही कर्मचारी संबंधित पीएसआयच्या घरी आल्यानंतर ते त्याला सोबत पोलीस स्थानकात घेऊन गेले. यानंतर पोलीस स्थानकात शहरातील राजकीय, सामाजिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी आमदार स्मिताताई वाघ, राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन, दीपक वाघमारे, भाजपचे सुभाष पाटील यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, तरुणीच्या घरच्यांनी तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी तात्काळ पीएसआय गवारेचा गोपनीय अहवाल बनवून धरणगाव पोलीस स्थानकातून कार्यमुक्त करुन त्‍याची बदली कंट्रोल रूमला करण्‍यात आली आहे.

हेही वाचलं का ?

SCROLL FOR NEXT