भुसावळ येथे गावठी पिस्तूल आणि धारदार चाकूचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत माजविणाऱ्या एकास गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. मो. हाशीम मो. सलीन खान (वय ४१) असे त्याचे नाव आहे.
भुसावळ येथील प्रल्हाद नगरात राहणारा मो. हाशीम मो. सलीन खान याने नशिराबाद गावात गावठी पिस्तूल घेऊन दहशत पसरवत असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यांनी नेमलेल्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, हवालदार संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, परेश महाजन, रवींद्र पाटील यांनी यांनी मो. हाशीम मो.सलीन खान याला नशिराबाद बसस्थानकाजवळून अटक केली .
पोलिसांनी केलेल्या तपासात मो. हाशीमकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतूस व धारदार चाकू सापडला आहे. मो. हाशीम मो. सलीन खान हा भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात फरारी असून, त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती पाेलिस सूत्रांनी दिली.
हेही वाचलंत का?
पाहा व्हिडिओ : कोल्हापूर जिल्ह्यातील किटवडेच्या पावसाने चेरांपुजीलाही 'घामटा' फुटतो