रोहा ग्रामदैवत श्री धावीर महाराज यांच्या उत्सवाला सुरुवात; सशस्त्र पोलीस दलाची मानवंदना | पुढारी

रोहा ग्रामदैवत श्री धावीर महाराज यांच्या उत्सवाला सुरुवात; सशस्त्र पोलीस दलाची मानवंदना

रोहे : पुढारी वृत्तसेवा

संपूर्ण रायगड जिल्ह्याला उत्सुकता लागलेल्या रोहा चे ग्रामदैव श्री धावीर महाराज पालखी उत्सवाला शनिवारी पहाटे सुरुवात झाली. सकाळी साडेपाच्या सुमारास श्री धावीर महाराजांची पालखी मंदिरात आणण्यात आले. श्री धावीर महाराजांच्या मंदिरात विधी व धार्मिक विधी होत आरती पूजा करून सहाच्या सुमारास रायगड पोलीस दलाच्या वतीने रोहा पोलीस निरीक्षक श्री संजय पाटील यांनी श्री धावीर महाराजांना त्यांच्या पथकास समवेत श्री धावीर महाराजांना सशस्त्र सलामी दिली.

त्यानंतर संपूर्ण श्री धावीर महाराज परिसरात श्री धावीर महाराज की जय असा गगनभेदी गजर झाला. सशस्त्र सलामीचा सोहळा शेकडो भक्तांनी आपल्या नयनी टिपला. पालकमंत्री आदिती तटकरे, खा. सुनील तटकरे, आ. प्रशांत ठाकूर, आ. अनिकेत तटकरे या मान्यवरांच्या व भाविकांच्या दर्शनानंतर पारंपारिक वाद्यांच्या गजरात रोहयाचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी उत्सव आला सुरुवात झाली.

सामाजिक एकतेचे प्रतिक असलेल्या श्री धावीर महाराजांच्या पालखी उत्सवाला सुरुवात झाल्यानंतर संबळ खालुबाज्या या पारंपारिक वाद्य वृंदावर श्री धावीर महाराजांची पालखी उत्सवाला सुरुवात होऊन पालखी रोहा शहराकडे मार्गस्थ झाली. सर्व जातीय धर्मांच्या श्री धावीर महाराजांच्या भाविकांनी दर्शन घेत ओवाळणी करीत ठिकाणी पूजा केली. शहरात भाविकांनी सुबक रांगोळी पताका विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उत्सव माय केल्याचे दिसून आले. श्री धावीर महाराजांचा पालखी उत्सव कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत पारंपारिक पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणात सुरू आहे.

हेही वाचा : Amruta Khanvilkar : एक लाजरान साजरा मुखडा…

श्री धावीर महाराज पालखी सोहळा : यांची होती उपस्थिती

यावेळी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, रायगड जिल्हा राष्ट्रवादी कार्याध्यक्ष मधुकर पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, प्रांताधिकारी डॉ.यशवंत माने, पोलिस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, तहसिलदार कविता जाधव, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. प्रशांत देशमुख, मकरंद बारटक्के, उत्सव समितीचे अध्यक्ष शैलेश कोळी, भूषण भादेकर, विजयराव मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख समीर शेडगे, लालताप्रसाद कुशवाह,सुभाष राजे, आनंद कुलकर्णी, ॲड. सुनिल सानप, महेश सरदार, संदीप सरफळे, आप्पा देशमुख, हेमंत कांबळे, अनिल भगत, भाजप जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष अमित घाग, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष अमित उकडे, युवाधिकारी राजेश काफरे, रविंद्र चाळके, संजय कोनकर, नगरसेवक महेंद्र गुजर, महेश कोल्हटकर, राजेंद्र जैन,समीर सकपाळ, महेंद्र दिवेकर, सौ. पूजा पोटफोडे आदींसह ट्रस्ट व उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व रोहेकर ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.

परंपरेप्रमाणे सकाळी ठीक सहानंतर वाजता शासकीय मानवंदना देण्यात येवून या अभूतपर्व सोहळ्याला सुरुवात झाली. रायगड पोलिसांच्या वतीने पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित पोलीस पथकाने श्री धावीर महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली.

श्री धावीर महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत देशमुख व उत्सव समिती अध्यक्ष शैलेश कोळी यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत केले.

ठिकठिकाणी पालखीच्या स्वागतासाठी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या तसेच जागोजागी सुबक व आकर्षक रांगोळ्याही काढण्यात आल्या होत्या. शहरातील पालखी मार्गावर अनेक ठिकाणी पुष्पवर्षाव करून पालखीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

हा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री धावीर महाराज देवस्थान ट्रस्ट व उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेत आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक महसूल, पोलीस, नगरपरिषद,आरोग्य यंत्रणांनीदेखील हा सोहळा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी चोख व्यवस्था ठेवली होती.

Back to top button