पुणे : दौंड शहरात चोरट्यांनी तीन घरे फोडली, सीसीटीव्हीत चोरटे कैद | पुढारी

पुणे : दौंड शहरात चोरट्यांनी तीन घरे फोडली, सीसीटीव्हीत चोरटे कैद

दौंड; पुढारी वृत्तसेवा: दौंड शहरात शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी तीन घरे फोडली. यात एक लाख तीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.  एका पोलीस हवालदाराच्या घरात चोरी केली. यावेळी  चोरट्यांनी केलेल्‍या  मारहाणीत ते जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांनीकडून मिळालेली माहिती अशी की, शनिवारी (दि.१६) पहाटे तीनच्या सुमारास दौंड पोलिस स्टेशनचे पोलीस हवालदार अण्णा देशमुख यांच्या घराच्या मागील दरवाज्यातून चार- पाच चोरटे घरात शिरले.  अण्णा देशमुख यांना मारहाण करून त्यांच्या घरातील कपाटातील सोने व रोख रक्कम लंपास केली.

त्यानंतर या चोरट्यांनी अण्णा यांच्या घराशेजारी असलेल्या ढमे यांच्या घरात चोरी केली. त्यानंतर त्यांनी गजानन सोसायटी येथील कुपेकर यांच्या घरीदेखील चोरी केली. सलग चोरट्यांनी तीन घरे फोडली. यामुळे दौंड शहरात खळबळ माजली आहे.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, फौजदार दिलीप भाकरे, पुणे अन्वेषण शाखेचे फौजदार येळे, पोलीस हवालदार आसिफ शेख, पांडुरंग थोरात, सचिन बोराडे व इतर पोलिसांनी या भागाची पाहणी केली. तेथील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाले आहेत.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ : कोल्हापूर जिल्ह्यातील किटवडेच्या पावसाने चेरांपुजीलाही ‘घामटा’ फुटतो

Back to top button