उत्तर महाराष्ट्र

कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील राजीनामे सत्र  सुरूच!

अनुराधा कोरवी

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राजीनाम्याच्या सत्रामुळे चर्चेत आले आहे. माजी कुलगुरू पी. पी. पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर राजीनामा देण्याचे सत्र सुरू झाले. नवीन परीक्षा नियंत्रक प्रा. के. एफ. पवार हे आताच नियुक्त झाले होते. त्यांनी पण राजीनामा दिला.

या राजीनाम्याच्या सत्रामागे नेमके कोणते कारण आहे? याचा उलगडा अजूनही झालेला नाही. मात्र, राजीनाम्याचे सत्र सतत सुरू राहिले तर याचा परिणाम विद्यार्थ्यांना भोगावा लागणार की काय अशी शंका पालकांच्यात निर्माण होत आहे. तर राजीनाम्याचे सत्र का सुरू झाले आहे? याचा खुलासा कुलगुंरूनी करावा अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे.

कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे तत्कालीन माजी कुलगुरू पी. पी. पाटील यांनी विद्यापीठाचा भोंगळ कारभार आणि ठेकेदार यांच्या दबावाला बळी पडून अचानक राजीनामा दिला होता. त्यानंतर लगेच संशोधन चोरी प्रकरणात असलेले माजी प्रा. कुलगुरू माहुलीकरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

याच दरम्यान परिक्षा नियंत्रक बी. बी. पाटील व भटू प्रसाद पाटील यांनी ताबोडतोब राजीनामा देऊन नाशिकला गेले. या पाठोपाठ गोहील यांनीही राजीनामा दिला. यानंतर प्रभारी कुलसचिव म्हणून अँड. भादलीकर यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी पण लगेच राजीनामा दिला. नवीन परिक्षा नियंत्रक प्रा. के. एफ. पवार हे आताच नियुक्त झाले होते त्यांनी देखील राजीनामा दिल्याने ही खळबळजनक बाब समोर आली आहे. कोणाच्या दबावामुळे हे राजीनामा सत्र सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विद्यापीठात किती मोठा भ्रष्टाचार आहे हे ऑनलाईन परिक्षा प्रकरणाचा गोंधळ, सुरक्षा रक्षक, दैनिक कामगार, सफाई कामगार या सर्व प्रकरणामुळे उघड झाले आहे. या सर्व प्रकरणाची आणि बिले काढण्यासाठी केलेले बेकायदेशीर एका व्यक्तीच्या नावाने केलेले ठराव यांची चौकशी होणार आहे. या सर्व बाबीचे राजीनाम्या मागे काय कारण आहे काय? यांची देखील चौकशी होणार आहे.

तसेच हे राजीनामा देण्यामागे आणखी काही कारणे आहेत का?, कशामुळे एकापाठोपाठ राजीनामा देण्याचे सत्र सुरू झाले आहे? याचा खुलासा प्रभारी कुलगुंरूनी करावा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष अँड कुणाल पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सचिव भूषण भदाणे यांनी केले आहे.

तसेच विद्यापीठाचे नाव खराब होत आहे, त्यामुळे ही बदनामी कधी थांबेल? व याला कोण जबाबदार आहे. किंवा कोणाला जबाबदार धरून त्याच्याविरुध्द न्यायालयात तक्रार दाखल करणार याचा पण खुलासा करावा अशी विनंती त्यांनी केली आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT