उत्तर महाराष्ट्र

जळगाव : तीन अपत्य असल्याने ओढरेच्या सरपंच अपात्र ; जिल्हाधिकारी यांचे आदेश

गणेश सोनवणे

जळगाव पुढारी वृत्तसेवा : चाळीसगाव तालुक्यातील ओढरे येथील सरपंच पुष्पा पवार यांना २०११ नंतर तिसरे अपत्य असल्याने त्यांना अपात्र घोषित करावे अशी तक्रार बळीराम पवार यांनी दाखल केली होती. त्या तक्रारीची दखल घेत सरपंच पवार यांना तिसरे अपत्य असल्याचे चौकशीअंती सिद्ध झाल्याने, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ओढरे सरपंचावर अपात्रतेची कारवाई करीत तिसरे अपत्य प्रकरणी सरपंच सदस्य पदावर राहण्यास अपात्र असल्याचे निर्देश दिले आहेत.

चाळीसगाव तालुक्यातील ओढरे येथील सरपंच पुष्पा जगन पवार यांना तिसरे अपत्य असून त्यांना ग्रामपंचायत अधिनियमानुसार सरपंच, सद्स्य पदावरून अपात्र घोषित करावे, अशी तक्रार बळीराम दगडू पवार यांनी विवाद अर्ज क्र. ४९/०२१ नुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल केली होती. या तक्रारीची चौकशी सुनावणी १२ सप्टेबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे घेण्यात आली. या सुनावणी अंती सोमवार (२८ फेब्रुवारी २०२२) रोजी ओढरे येथील सरपंच पुष्पा जगन पवार यांना ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम १४-जे नुसार सरपंच सदस्य पदावरून अपात्र घोषित करण्यात आले आहे.

सरपंच पुष्पा जगन पवार यांनी तिसरे अपत्य माझे नसून माझ्या पतीने दुसरे लग्न केले असून दुसरी पत्नी बेपत्ता आहे. त्या लग्नापासून झालेले अपत्य असल्याचा युक्तिवाद पुष्पा जगन पवार यांनी केला. हा बचाव युक्तिवाद जिल्हाधिकारी यांनी फेटाळल्याने सरपंच पुष्पा पवार यांना ग्रामपंचायत अधिनियमानुसार सरपंच, सद्स्य पदावरून अपात्र घोषित करण्यात आले. तक्रारदार यांच्यातर्फे एड. विश्वास भोसले यांनी काम पाहिले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT