औरंगाबाद : वाळूज एमआयडीसीत वाहनांचे इंडीकेटर बनवणाऱ्या कंपनीला आग | पुढारी

औरंगाबाद : वाळूज एमआयडीसीत वाहनांचे इंडीकेटर बनवणाऱ्या कंपनीला आग

वाळूज पुढारी वृत्तसेवा : वाळूज एमआयडीसीतील जोगेश्वरी हद्दीत असलेल्या LAPL Automotive private LTD वाहनांचे इंडिकेटर तयार करणाऱ्या कंपनीला आज (दि. 2) दुपारी १२ वाजेच्या सुमारास कंपनीच्या पेंट शॉपला आग लागली. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात कंपनीतील मटेरियल, मशनरी जळून खाक झाले असून, मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

कंपनीचे मॅनेजर सुनील धारपूरकर यांनी या आगीत जवळपास एक ते दीड कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. कंपनी चे मालक नीरज गोयल हे दिल्ली येथे गेले आहेत. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान व कंपनीतील तसेच शेजारच्या कंपनीतील कामगारांनी प्रयत्न केले. अद्याप आगीचे कारण समजू शकलेले नाही.

हेही वाचलतं का?

Back to top button