नाशिकमध्ये शिवसेनेकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध | पुढारी

नाशिकमध्ये शिवसेनेकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध

नाशिक पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. “समर्थ नसते तर शिवाजीला कुणी विचारलं असतं का?” या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचे राज्यभरात आंदोलनाच्या रुपात ठिकठिकाणी पडसाद पाहायला मिळाले.

आज (दि.2) नाशिकमध्ये शिवसेनेने राज्यपाल यांच्या वक्तव्याविरोधात टीकेची झोड उठवली. शालिमार येथील शिवसेना भवनासमोर आंदोलन करत शिवसेना पदाधिका-यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध केला. यावेळी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, अजय बोरस्ते, विलास शिंदे, सुधाकर बडगुजर, विजय करंजकर, वसंत गीते, सुनील बागुल, शोभा मगर, उमेश चव्हाण, सुभाष शेजवळ यांच्यासह शिवसेनेचे अन्य कार्यकर्ते पदाधिकारी  उपस्थित होते.

शिवसेना,www.pudhari.news

औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात बोलताना राज्यपालांनी हे वक्तव्य केले होते.

यावेळी आंदोलनात शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्याही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Back to top button