नाशिक : कांदा (Onion News) व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे गेल्या सात दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद आहेत. कांदा व्यापाऱ्यांच्या या संपामुळे शेतकऱ्यांचा कांदा चाळीत पडला असून, तो सडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्न गांभीर्याने घेत मंगळवारी (दि. 26) बैठक घेतली. नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत, मात्र व्यापारी बांधवांनी आपली खरेदी काही मागण्यांसाठी थांबवली आहे. यातील मागण्या काही केंद्र आणि काही मागण्या राज्य पातळीवरील आहेत. यासंदर्भात मंगळवारी मंत्रालयात बैठक घेतली. काही मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी कांदा खरेदीचे आवाहन व्यापारी बांधवांना केले आहे. व्यापाऱ्यांनी आपली भूमिका बदलली नाही, तर पर्यायी व्यवस्था करून खरेदी लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, असे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा :