नाशिक

Nashik News : इगतपुरीच्या हॉटेल व्यावसायिकास ठार मारण्याची धमकी, चौघांना कोठडी

गणेश सोनवणे

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा, रहिवासी इमारत मालमत्तेच्या संमतीपत्रावर जबरदस्तीने सह्या घेऊन फिर्यादीला जिवे ठार मारण्याची धमकी देणारा गुंड कवुभाई याच्यासह तीन संशयितांना इगतपुरीचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांनी अटक केली. आहे. सदर संशितांकडून गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांसह मोबाइल व कागदपत्रे जप्त केली आहेत. (Nashik News)

शहरातील व्यापारी पंकज जगदीश बजाज (२३), संतोष गंगाबिसन बजाज (४५) यांनी स्वमालकीची राहती इमारत व किराणा दुकान हॉटेल व्यावसायिक अभय दिलीपचंद भन्साळी (४७) यांच्याकडे ७६ लाख पन्नास हजार रुपये रोख घेऊन सहा महिन्यांसाठी तारण ठेवली होती. मात्र, मुदत संपताच भन्साळी यांनी सदर मालमत्ता विक्रीस काढण्याचे फलक इमारतीला लावले होते. आपली मालमत्ता विक्री होणार या भीतीने पंकज बजाज, संतोष बजाज यांनी गुंडाची मदत घेत संमतीपत्र तयार केले. ३० सप्टेंबरच्या सायंकाळी पाचच्या सुमारास भन्साळी यांना फोन करून चर्चा करण्याच्या बहाण्याने इमारतीजवळ बोलावले. नंतर जबरदस्तीने गाडीत बसवून नगर परिषदेच्या परिसराच्या सांडव्यावर उभे केले. कनुभाई ऊर्फ फ्रान्सीस पॅट्रिक मॅनवेल, अकीव कुरेशी यांनी भन्साळी याला जिवे ठार मारण्याची धमकी देत मालमत्तेचा मोबदला न देता संमतीपत्रावर सह्या घेतल्या. भयभित अभय भन्साळी यांची मानसिक स्थिती बिघडल्याने त्यांनी आत्महत्या करण्यासाठी चिठ्ठी लिहिली. मात्र, ही घटना कुटुंबीयांना समजताच त्यांनी या निर्णयापासून परावृत्त केले. (Nashik News)

अभय भन्साळी यांनी याबाबत तर पोलिसांत फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक सुर्वे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून सापळा रचला. पोलिस  महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील व पोलिस अधीक्षक शहाजी उमाप,  पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलिस उपअधीक्षक सुनील भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसनिरीक्षक राजू सुर्वे यांनी ही विशेष कामगिरी केली.

चाैघां संशयिताना न्यायालयीन कोठडी
इगतपुरी पोलिस ठाण्यात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि.३) इगतपुरी न्यायालयाने चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिस निरीक्षक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT